आई जगदंबेची कृपा ः. राशीनच्या अकराजणांचे रिपोर्ट निगेटिव्ह, पण आजीमुळे नातीला बाधा

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 22 मे 2020

महिलेचा रिपोर्ट मृत्यूनंतर पॉझिटिव्ह आला होता. त्यामुळे प्रशासनाला आणि त्या महिलेच्या संपर्कातील लोकांची तपासणी करण्यात आली. त्यातील अकराजणांचे कोरोना अहवाल निगेटिव्ह आले आहेत. मात्र, त्या महिलेच्या नातीला कोरोची बाधा झाली आहे.

कर्जत ः कर्जत तालुक्यात मुंबईच्या महिलेमुळे कोरोनाची बाधा झाली आहे. वाशी येथून ती महिला सुनेच्या माहेरी आली होती. तिला सर्दी, खोकला होता. परंतु प्रशासनाने हलगर्जीपणा केल्यामुळे त्या महिलेला जीव गमवावा लागला. मात्र, मृत्यूनंतर त्या महिलेचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. त्यामुळे राशीनमध्येच नव्हे तर संपूर्ण कर्जत तालुक्यात खळबळ उडाली होती. शेजारील श्रीगोंदा, जामखेड, करमाळा तालुक्यातील लोकही अलर्ट झाले होते.

हेही वाचा - कोपरगावात संसर्गाचा तिसरा बळी

महिलेचा रिपोर्ट मृत्यूनंतर पॉझिटिव्ह आला होता. त्यामुळे प्रशासनाला आणि त्या महिलेच्या संपर्कातील तेरा लोकांची तपासणी करण्यात आली. त्यातील अकराजणांचे कोरोना अहवाल निगेटिव्ह आले आहेत. रिपोर्ट निगेटिव्ह यावेत, यासाठी जगदंबेचा धावा केला जात होता. मात्र, त्या महिलेच्या नातीला कोरोची बाधा झाली आहे. ती सहा वर्षांची असल्याचे समजते. तर एकाचा अहवाल राखीव ठेवला आहे. त्याचे नमुने पुन्हा घेण्यात येणार आहेत. बाधित महिला इतर नातेवाईकांच्याही संपर्कात आली होती, अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संदीप पुंड यांनी दिली.

कोरोना रूग्ण सापडल्याने तालुका प्रशासानाने राशीन शहर बंद केले होते. ज्या परिसरात महिला थांबली होती, तोही सील करण्यात आला आहे. राशीनकडे येणाऱ्या सर्व मार्गावर प्रशासानाने वॉच ठेवला आहे.

पाथर्डीतही कोरोनाबाधित

पाथर्डी तालुक्यातील मोहोज देवढे येथील एक कोरोनाबाधित रूग्ण बरा होऊन घरी गेला आहे. तो शेतकरी वाशी मार्केटला शेवग्याच्या शेंगा विकण्यासाठी गेला होता. त्यावेळी त्याला बाधा झाली असावी. त्यानंतर आता पुन्हा एक मुंबईच्या गरोदर महिलेला लागण झाली आहे. ती पाथर्डी तालुक्यात चिंचपूर पांगूळ येथे सध्या वास्तव्यास आहे. ती पोलिस कर्मचाऱ्याची पत्नी अाहे. अशी माहिती जिल्हा रूग्णालयाकडून देण्यात आली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Another corona patient in Rashin