कोपरगावात संसर्गाचा तिसरा बळी, अहवालाकडे लागले लक्ष

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 22 मे 2020

मयत महिलेचें दोन वर्षापूर्वी लग्न झाले होते. तिला दीड वर्षाची मुलगी आहे.तिचे सासर येवला असून ती गेल्या दोन महिन्यांपासून श्वासोच्छ्वास व घसा, छातीमध्ये त्रास होत असल्याने उपचारासाठी माहेरी आली होती

कोपरगाव : तालुक्यातील संवत्सर शिवारातील मनाई वस्तीवरील एका 22 वर्षीय विवाहित महिलेचा आज सकाळी दहा वाजेच्या सुमारास मृत्यू झाला. तिला सर्दी, खोकला, कफ अशी लक्षणे होती. तिच्यावर क्षयरोगाचे उपचार सुरू होते. या मृत्युमूळे आरोग्य विभागात खळबळ उडाली आहे. 

ग्रामीण रुगणालायचे वैद्यकीय अधीक्षक डॉ कृष्णां फुलसौंदर यांनी सदर महिलेच्या घशाचे स्राव तपासणीसाठी अहमदनगर येथे पाठवले असल्याचे सांगितले. तालुक्यात संसर्ग जन्य आजाराचा हा तिसरा बळी ठरतो की काय याकडे लक्ष लागून आहे.
गेल्या दोन महिन्यांपासून देशात कोरोना संसर्गजन्य आजराने कहर केला आहे. शहरातील लक्ष्मीनगर भागातील एका महिलेचा तर शिंगणापूर येथील एका महिलेचा सारीसदृश्य आजाराने मृत्यू झाल्याची घटना ताजी आहे. आज पुन्हा  विवाहित महिलेचा कोरोना व सारी सदृश आजाराचे लक्षणाने मृत्यू झाला. तिचा तपासणी अहवाल आल्यावर सर्व चित्र स्पष्ट होईल. दरम्यान शासनाच्या वतीने मनाई परिसर सील करण्याचे काम सुरू झाले.

हेही वाचा - प्रशासनाच्या चलता है भूमिकेमुळे कर्जतमध्ये शिरला कोरोना

या बाबत कोपरगाव ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ कृष्णा फुलसौंदर यांनी दिलेली अधिक माहिती अशी की, सदर विवाहित महिलेला घशात व छातीत  सर्दी, खोकला ,कफ दम लागणे असा त्रास होत असल्याने 
शुक्रवार दि 22 मे रोजी सकाळी दहाच्या दरम्यान ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. ग्रामीण रुग्णालयाचे डॉ विजय गणगोटे यांनी प्राथमिक तपासणी करून तातडीने उपचार सुरू केले. काही मिनिटांतच महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. डॉ फुलसौंदर यांनी मयत महिलेचा मृत्यू कोरोना किंवा सारी संसर्गजन्य आजराने  मृत्यू झाला की काय असा संशय व्यक्त करीत मयत महिलेच्या घशाचे स्राव पुढील तपासणीसाठी अहमदनगर येथे पाठवले.  

मयत महिलेचें दोन वर्षापूर्वी लग्न झाले होते. तिला दीड वर्षाची मुलगी आहे.तिचे सासर येवला असून ती गेल्या दोन महिन्यांपासून श्वासोच्छ्वास व घसा, छातीमध्ये त्रास होत असल्याने उपचारासाठी माहेरी आली होती. दरम्यान संवत्सर प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये तिने तपासणी केली असता क्षयरोगाचे लक्षणे असल्याचे निष्पन्न झाले. नंतर उपचार सुरू केले होते. प्रकृतीमध्ये विशेष फरक पडत नसल्याने  एका खाजगी डॉक्टर कडे तिने उपचार घेतला.

जाणून घ्या - भाजपात परतला राम

लॉकडाऊन काळात कुठे बाहेर जाता येत नसल्याने जवळचे संपलेले औषध वेळेत न मिळाल्याने सादर महिलेची  प्रकृती  अधिक बिघडली. शुक्रवारी तिच्या वडिलांनी कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. ग्रामीण रुग्णालयाचे अधिकारी प्राथमिक उपचार करून तिला अहमदनगर येथे पाठविण्याच्या तयारीत असताना तिचा मृत्यू झाला. या महिलेच्या मृत्यूने तालुका हादरून गेला आहे. दरम्यान ग्रामीण रुग्णालयाचे निर्जंतुकीकरणं करण्यात आले अाहे. आज दिवसभर ओपीडी बंद ठेवण्यात आली


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Third victim of infection in Kopargaon