esakal | नेवाशात आणखी एका विवाहितेने केली विहीर जवळ

बोलून बातमी शोधा

Another married woman committed suicide in Nevasa}

पोलिसांनी पतीस अटक केली असून, अन्य आरोपी पसार आहेत. सुरेखा शरद थोरे (वय 22, रा. पाथरवाला) असे मृत महिलेचे नाव आहे.

ahmednagar
नेवाशात आणखी एका विवाहितेने केली विहीर जवळ
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नेवासे : तालुक्‍यातील पाथरवाला शिवारात एका विहिरीत विवाहितेचा मृतदेह आढळला. याप्रकरणी तिच्या पतीसह सासू-सासरे व दीर, अशा चौघांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

पोलिसांनी पतीस अटक केली असून, अन्य आरोपी पसार आहेत. 
सुरेखा शरद थोरे (वय 22, रा. पाथरवाला) असे मृत महिलेचे नाव आहे. तिचा मृतदेह जुन्या पिंप्री शहाली-नांदूर शिकारी रस्त्यावरील त्यांच्या विहिरीत सोमवारी (ता. 1) सकाळी आढळला.

या बाबत सुरेखाचा पती शरद, मेव्हणे बाबासाहेब खाटीक यांनी कुकाणे पोलिसांत खबर दिली. सुरेखा व शरदचे अडीच महिन्यांपूर्वीच लग्न झाले होते. पोलिस निरीक्षक विजय करे, सहायक पोलिस निरीक्षक विजय ठाकूर, कॉन्स्टेबल दिलीप राठोड यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली.

पोलिसांनी मृतदेह विहिरीबाहेर काढून उत्तरीय तपासणी केली. पती शरद रामकिसन थोरे, सासरे रामकिसन भाऊराव थोरे, सासू शोभा व दीर ज्ञानदेव थोरे यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून, पोलिसांनी पती शरदला अटक केली आहे. अहमदनगर