आरटीओकडून गाडीला हवा असलेला नंबर मिळवण्यासाठी अर्ज करण्याचे आवाहन

गौरव साळुंके
Saturday, 21 November 2020

मोटार वाहन नियमानुसार वाहनाच्या चॉईस क्रमांक नोंदणीसाठी सरकारला ठराविक शुल्क द्यावा लागणार आहे. येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाने दुचाकी वाहनांसाठी एमएच 17 सीएनची नविन मालिका सुरु केली आहे.

श्रीरामपूर (अहमदनगर) : मोटार वाहन नियमानुसार वाहनाच्या चॉईस क्रमांक नोंदणीसाठी सरकारला ठराविक शुल्क द्यावा लागणार आहे. येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाने दुचाकी वाहनांसाठी एमएच 17 सीएनची नविन मालिका सुरु केली आहे.

त्यामुळे आपल्याला चॉईस क्रमांक नोंदणीसाठी आकर्षक आणि पसंतीचा नोंदणी क्रमांकाचा अर्ज आणि सदर क्रमांकासाठी लागणारा शासकीय शुल्काचा धनादेश शुक्रवारी (ता. 27) वाहतुक कार्यालयाच्या वाहन नोंदणी विभागात जमा करावा लागणार आहे. 

आकर्षक क्रमांकाच्या अर्जासोबत केंद्रीय मोटार वाहन आणि महाराष्ट्र मोटार वाहन नियमानुसार अर्जदारांच्या पत्त्याच्या पुराव्यासह फोटो ओळखपत्राची साक्षांकित प्रत सादर करावी. तसेच कोणत्याही राष्ट्रीयकृत बँकेचा डिमांड ड्राफ्ट उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांच्या नावे काढून पसंती क्रमांक शुल्काची रक्कम डिमांड ड्राफ्टद्वारे भरावी.

नगर जिल्ह्यातील बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
एकदा राखून ठेवलेला पसंती क्रमांक दुसरया व्यक्ती अथवा संस्थेच्या नावे हस्तांतरीत होणार नाही. तसेच रद्दही केला जाणार नाही. विशिष्ट आकर्षक क्रमांक आरक्षित करण्यासाठी एकापेक्षा अधिक अर्ज आल्यास अशा क्रमांकाची यादी कार्यालयाच्या सुचना फलकावर शुक्रवारी प्रदर्शित केली जाईल. तसेच सदरच्या आकर्षक क्रमांकासाठी लिलाव प्रक्रियेमध्ये सहभागी होण्यासाठी बुधवारी (ता.2) उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांच्या दालनात हजर रहावे.

लिलावात विशिष्ट आकर्षक क्रमांकासाठी एकापेक्षा अधिक प्राप्त अर्जदारांनी सदरच्या क्रमांकासाठी शासकीय शुल्का व्यतिरीक्त अतिरीक्त रकमेचा धनादेश बंद सोबत आणावा. त्यानंतर सहायक उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांच्या दालनात अर्जदारांसमक्ष त्यांचे बंद लिफाफे उघडले जातील. त्यापैकी ज्या अर्जदारांचा धनादेश अधिक रकमेचा असेल त्यांना विशिष्ट आकर्षक क्रमांक मिळेल. 

चारचाकी परिवहनेत्तर वाहनांच्या आकर्षक क्रमांकासाठी परिवहनेत्तर चारचाकी वाहन मालिकेत असणारया शुल्काच्या तीन पट शुल्क भरुन सीए मालिकेतील आकर्षक क्रमांक मिळेल. सदर मालिकेतील एकाच क्रमांकासाठी दुचाकी वाहन व चारचाकी वाहनांसाठी अर्ज आल्यास, सदर क्रमांकासाठी दुचाकी अर्जदार आणि चारचाकी अर्जदारांनी पाठवलेल्या अतिरिक्त धनादेशाची रक्कम अधिक असेल त्यांना तो क्रमांक मिळेल. आकर्षक क्रमांकासाठी लागणारया शासकीय शुल्काबाबतची माहिती उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या सुचना फलकावर तसेच 31 क्रमांकाच्या खिडकीसमोर लावल्याची माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अश्पाक खान यांनी दिली.

संपादन : अशोक मुरुमकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Appeal to apply from RTO to get the desired number of the vehicle