कर्जतल स्वच्छ, सुंदर करण्यासाठी एकत्र येण्याचे आवाहन

निलेश दिवटे
Saturday, 3 October 2020

लोकसहभाग व सर्व सामाजिक संघटनेच्या माध्यमातून स्वच्छ सर्वेक्षणाचे अभियान यशस्वी करू या. माझे तुझे न म्हणता आपले शहर स्वच्छ, सुंदर आणि हरित करण्यासाठी ही लोकचळवळ व्हावी. यासाठी सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन उपनगराध्यक्ष नामदेव राऊत यांनी केले.

कर्जत (अहमदनगर) : लोकसहभाग व सर्व सामाजिक संघटनेच्या माध्यमातून स्वच्छ सर्वेक्षणाचे अभियान यशस्वी करू या. माझे तुझे न म्हणता आपले शहर स्वच्छ, सुंदर आणि हरित करण्यासाठी ही लोकचळवळ व्हावी. यासाठी सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन उपनगराध्यक्ष नामदेव राऊत यांनी केले.

कर्जत शहर स्वच्छ आणि सुंदर करून स्वच्छ सर्वेक्षणात मानांकन मिळविण्यासाठी नगरपंचायत प्रांगणात शहरातील विविध सामाजिक संघटनांच्या प्रतिनिधींची बैठक झाली. यावेळी रोटरी क्लबचे अध्यक्ष प्रा. विशाल मेहेत्रे, हरित अभियानाचे अनिल तोरडमल, राजमुद्रा प्रतिष्ठानचे अध्यक्ष विजयकुमार तोरडमल, आजी माजी सैनिक संघटनेचे अध्यक्ष भाऊसाहेब रानमाळ, जैन संघटनेचे अध्यक्ष विजयकुमार खाटेर, प्रसाद शहा, अभय बोरा, मेडिकल असोसिएशनचे राम ढेरे, शिक्षक संघटनेचे नवनाथ अडसूळ, अशोक नेवसे, उद्धव थोरात, दत्ता राऊत, रवींद्र राऊत, व्यापारी संघटनेचे अर्जुन भोज, रमेश काकडे, पांडुरंग क्षीरसागर, पत्रकार संघाचे अध्यक्ष मुन्ना पठाण उपस्थित होते.

नगर जिल्ह्यातील बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
ते म्हणाले, स्वच्छ सर्व्हेक्षण अभियानात लोकसभागासह कचरा व्यवस्थापन, प्रक्रिया, सांडपाण्याचे व्यवस्थापन आदि.या नुसार गुण विभागणी असून आपण शहरात सर्वच बाबतीत चांगले व्यवस्थापन केलेले आहे ते फक्त चांगल्या पद्धतीने मांडून कर्जत ही स्वच्छतेची पंढरी ठरावी अशी कामगिरी सर्वांच्या सहकार्याने करायची आहे. आहे.श्रमदान,वृक्षारोपण,वृक्षसंवर्धन,कचरा व्यवस्थापनातून गांडूळ आणि कम्पोस्ट खत करणे आदी बाबी केल्या जातील.

कर्जत जिल्ह्यात नव्हे तर राज्यात अवल ठरण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करू या.
प्रास्ताविक करताना मुख्याधिकारी गोविंद जाधव म्हणाले स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेत सहभागी होण्यासाठी लोकसहभाग हा सर्वात महत्त्वाचा भाग आहे.ही स्पर्धा 31जानेवारी 2021 पर्यंत चालणार असून ती सहा हजार गुणांची आहे.संतोष समुद्र यांनी आभार मानले.
नगर पंचायत आणि काही सामाजिक संघटना रोज श्रमदान आणि वृक्षारोपण सुरू केले आहे. लवकरच योग्य नियोजन करून ही मोहीम अधिक व्यापक करण्याचे उपनगराध्यक्ष श्री राऊत यांनी स्पष्ट केले. 

संपादन : अशोक मुरुमकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: An appeal to come together to make Karjat clean and beautiful