esakal | ‘मराठी साहित्य’ पुरस्कारासाठी प्रस्ताव पाठवण्याचे आवाहन
sakal

बोलून बातमी शोधा

Appeal to send proposal for Marathi Sahitya award

मराठी साहित्य क्षेत्रात विशेष लेखन केलेल्या मान्यवरांना 12 वर्षापासून येथील प्रकाश किरण प्रतिष्ठान पुरस्कार देऊन सन्मानित करीत आहे.

‘मराठी साहित्य’ पुरस्कारासाठी प्रस्ताव पाठवण्याचे आवाहन

sakal_logo
By
गौरव साळुंके

श्रीरामपूर (अहमदनगर) : मराठी साहित्य क्षेत्रात विशेष लेखन केलेल्या मान्यवरांना 12 वर्षापासून येथील प्रकाश किरण प्रतिष्ठान पुरस्कार देऊन सन्मानित करीत आहे. यंदाच्या पुरस्कारासाठी साहित्यिकांनी आपले लेखन साहित्य पाठविण्याचे आवाहन संस्थापक अध्यक्ष लेविन भोसले यांनी केले आहे. 

मराठी कविता संग्रह, कथासंग्रह, कादंबरी, आत्मचरित्र, ललीत, वैचारिक वाड्मय, प्रवासवर्णन, दिवाळी अंक, नाताळ अंक अशा विविध मराठी साहित्य लेखनाच्या दोनप्रती, पासपोर्ट फोटो, अल्पपरिचय 31 डिसेंबरपर्यंत प्रकाश किरण प्रतिष्ठान संस्थापक अध्यक्ष लेविन भोसले आशीर्वादनगर, शिरसगाव रोड, प्रभाग एक श्रीरामपूर 413709 पत्यावर पाठविण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

पुरस्कार वितरण सोहळ्याचे जानेवारी मध्ये आयोजन केले असुन पुरस्कार विजेत्यांना सन्मान चिन्ह, पुरस्कार प्रमाणपत्र आणि शाल ग्रंथभेट देऊन सन्मानित केले जाणार असल्याचे भोसले यांनी सांगितले. शहरासह विविध ठिकाणच्या साहित्यिकांना आपले साहित्या तातडीने पाठविण्याचे आवाहन प्रकाश किरण प्रतिष्ठानने केले आहे.

संपादन : अशोक मुरुमकर