तीन माजी अध्यक्षांसह विद्यमान अध्यक्षांचे 'शनैश्वर' विश्वस्तपदासाठी गुडघ्याला बाशिंग

विनायक दरंदले
Monday, 14 December 2020

शनैश्वर देवस्थान ट्रस्टच्या विश्वस्त मंडळ निवडीसाठी तीन माजी अध्यक्षांसह विद्यमान महिला अध्यक्षांनी अर्ज केला आहे.

सोनई (अहमदनगर) : शनैश्वर देवस्थान ट्रस्टच्या विश्वस्त मंडळ निवडीसाठी तीन माजी अध्यक्षांसह विद्यमान महिला अध्यक्षांनी अर्ज केला आहे. तीन माजी उपाध्यक्षांसह सतरा आजी- माजी विश्वस्त नशिब आजमावत आहेत.

सहायक धर्मदाय आयुक्तांनी विश्वस्त पदासाठी अर्ज करताना ती व्यक्ती शनिशिंगणापुरातील मुळ रहिवासी असण्याची अट घातली असुन या पदाकरीता एकुण ८४ अर्ज दाखल झाले आहेत.यात माजी अध्यक्ष डाॅ.रावसाहेब बानकर,दादासाहेब दरंदले,प्रा.शिवाजी दरंदलेसह विद्यमान अध्यक्ष अनिता शेटे यांनी अर्ज केला आहे.

नगर जिल्ह्यातील बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
माजी उपाध्यक्ष सुरेश बानकर, भाऊसाहेब दरंदले, सोपान बानकरसह सतरा आजी- माजी विश्वस्तांचे अर्ज दाखल झाले असुन विश्वस्त पदासाठी सर्वच जणांची 'फिल्डिंग' लावण्यासाठी लगबग सुरु झाली आहे. गावात बानकर, दरंदले व शेटे आडनावाचे अधिक कुटुंब असुन विश्वस्त मंडळात याच आडनावाचा अधिक पगडा असतो. दहा- पंधरा वर्षापासून गावातल्या गावातच सोयरीक करायला अग्रक्रम दिला जात असल्याने अर्ज

भरणारे सर्वच उमेदवार एकमेकांचे पाहुणे आहेत. सध्या नातंगोतं बाजुला ठेवून अनेक जण मीच कसा विश्वस्त होईल याकरीता आटापिटा करताना दिसत आहे.८४ अर्जदारापैकी अकरा जणाचीच निवड होणार असल्याने शनिदेव कुणाला पावतो आणि कुणाला साडेसाती लावतो याविषयी परीसरात उत्सुकता लागली आहे.

संपादन : अशोक मुरुमकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Applications of three former presidents for election of Board of Trustees of Shaneshwar Devasthan Trust