प्रशासक बनण्याचे कार्यकर्त्यांचे स्वप्न धुळीस, श्रीगोंद्यात ५९ ग्रामपंचायतींचा समावेश

Appointment of Administrator on 59 Gram Panchayats in Shrigonda
Appointment of Administrator on 59 Gram Panchayats in Shrigonda

श्रीगोंदे : कोरोना लाॅकडाऊन काळात तालुक्यातील 59 ग्रामपंचायतींच्या मुदत संपत आहेत. त्यातील या महिन्यात 53 ग्रामपंचायती आहेत. या ग्रामपंचायतींवर आता प्रशासक नेमले जात आहेत. त्यासाठी गावातील कार्यकर्ते बाह्या सरसावून होते. त्यासाठी अनेकांनी फिल्डींगही लावली होती. मात्र त्या सर्वांचे स्वप्न भंगले आहे. आता प्रशासक म्हणून पंचायत समितीचे विस्तार अधिकारी, बांधकाम विभाग व शिक्षण विभागातील कर्मचारी-अधिकाऱ्यांची वर्णी लागणार आहे.

सप्टेंबर व पुढच्या आक्टोंबर महिन्यात तालुक्यातील 59 ग्रामपंचायतींची मुदत संपत आहेत. यात या महिन्यातील 53 तर पुढच्या महिन्यातील सहा ग्रामपंचायतींचा समावेश आहे. सध्या कोरोनाची महामारी सुरु आहे. त्यामुळे कुठल्याही ग्रामपंचायतींच्या निवडणूका होणार नाहीत. त्यामुळे मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींवर प्रशासक नेमण्याचा निर्णय सरकारने घेतला.

राज्यात सत्ताधारी असल्याने राष्ट्रवादी-काँग्रेस व शिवसेना पक्षाच्या गावातील कार्यकर्त्यांना निवडणूकीत नाही तर प्रशासक म्हणून सत्ता गाजविण्याचे स्वप्न पडली होती. आमदार भाजपाचे असले तरी पालकमंत्री राष्ट्रवादीचे असल्याने अनेकांनी फिल्डींग लावली होती. शिष्टमंडळे, भेटी-गाठी झाल्या. मात्र काही दिवसांपुर्वी कार्यकर्ते प्रशासक बनणार नसल्याचे समोर आले आणि अनेकांचे स्वप्न भंगले.

आता प्रशासक म्हणून सरकारी अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती होणार आहे. त्यात पंचायत समिती, कृषी विभागातील व्यक्तींना संधी मिळणार आहे. शिक्षण विभागातील केंद्र प्रमुखांनाही गावचा कारभार करता येणार आहे. मात्र, तालुक्यात अनेक केंद्र प्रमुखांच्या जागा रिक्त आहेत. अनेक ठिकाणी गुरुजींनाच केंद्रप्रमुख केले आहे. त्यामुळे या गुरुजींना प्रशासक केले जाणार का याची चर्चा आहे.

या ग्रामपंचायतींची संपणार सप्टेंबर महिन्यात मुदत
सुरोडी, येळपणे, बेलवंडी कोठार, बोरी, अजनुज, आर्वी- अनगरे, आढळगाव, बाबुर्डी, भानगाव, चांडगाव, चिखलठाणवाडी, ढवळगाव, ढोरजा, एरंडोली, गार, घोटवी, हिरडगाव, लिंपणगाव, म्हातार पिंप्री, मुंगुसगाव, पिसोरेखांड, सुरेगाव, शेडगाव, उक्कडगाव, उखलगाव, वेळू, चांभुर्डी, चिंभळे, घुगल वडगाव, घोडेगाव, हंगेवाडी, कामठी, कोथूळ, कोंडेगव्हाण, कोसेगव्हाण, कोरेगव्हाण, कोरेगाव, खांडगाव, म्हसे, निमगावखलू, निंबवी, पिंप्री कोलंदर, राजापूर, रुईखेल, सांगवी दुमाला, सारोळा सोमवंशी, टाकळी कडेवळीत, वडाळी, वांगदरी, येवती, चोराचीवाडी, रायगव्हाण व शिरसगावबोडखे. 

प्रशासकांना परस्पर बिलं काढता नाही येणार

पंचायत समितीचे गटविकास अधिकारी प्रशांत काळे म्हणाले, समितीसह कृषी विभागाचे विस्तार अधिकारी, बांधकाम विभागातील अधिकारी, शिक्षण विभागातील केंद्र प्रमुखांची प्रशासक म्हणून नेमणूक होत आहे. काही मोठ्या व महत्वाच्या गावात वेगळे अधिकारी नेमले जातील. जे नियमित केंद्रप्रमुख आहेत त्यांची नेमणूक होणार आहे. या प्रशासकांना कुठलीही बिले काढण्यापुर्वी आमची परवाणगी घ्यावी लागणार असून परस्पर बिले काढता येणार नसल्याचा आदेश काढत आहे. 

संपादन - अशोक निंबाळकर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com