पावसाअभावी पिकांची वाढ खुंटली; राहुरी तालुक्यात घटले खरिपाचे क्षेत्र

Farmer
Farmeresakal
Updated on

राहुरी (जि. नगर) : तालुक्‍यात अद्याप सर्वदूर पाऊस झालेला नाही. दीर्घ काळ खंडित पावसामुळे खरीप पिकांची वाढ खुंटली. परिणामी, उत्पादनात दहा-पंधरा टक्के घट होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यंदा खरिपाच्या पेरण्या २७ हजार २४०.८० हेक्टर (१६८.९८ टक्के) झाल्या. मागील वर्षीच्या तुलनेत खरिपाचे क्षेत्र तीन हजार हेक्‍टरने घटले. मात्र, तेवढेच चारापिकांचे वाढले आहे.

तालुक्यात जून-जुलैमध्ये २४७.६ मिलिमीटर (सरासरी १२५ टक्के) पाऊस झाला. मात्र, २१ जुलैनंतर खंड पडला. नऊ ऑगस्टच्या पावसाने पिकांना जीवदान दिले. मात्र, खंडित व तुरळक पावसामुळे खरीप हंगामातील पिकांच्या वाढीवर परिणाम झाला आहे. त्यामुळे उत्पादनात दहा ते पंधरा टक्के घट होणार आहे. सध्या कापूस व बाजरीला पावसाची नितांत गरज आहे. सोयाबीन फुलोऱ्यात आले आहे. त्यामुळे मोठा पाऊस झाल्यास सोयाबीनला फटका बसणार आहे.

तालुक्यात कृषी विभागातर्फे खरीप हंगामात (ऊस पीक वगळून) १६ हजार १२०.७६ हेक्‍टरवर पेरणीचे उद्दिष्ट होते. प्रत्यक्षात २७ हजार २४०.८० हेक्टर क्षेत्रावर पेरण्या झाल्या. सरासरीच्या १६८.९८ टक्के जास्त पेरण्या झाल्या. मागील वर्षीच्या तुलनेत मात्र तीन हजार हेक्‍टरवर कमी पेरण्या झाल्या आहेत. आडसाली उसाची लागवड ३७३६.१९ हेक्टर झाली आहे. यंदा उसाचे क्षेत्र खोडव्यासह २१ हजार हेक्टर राहण्याचा अंदाज आहे. तालुक्यात खरीप व इतर पिके ४६ हजार ३५०.६९ हेक्टर क्षेत्रावर उभी आहेत.

Farmer
मुलीचे अपहरण प्रकरण : आरोपीच्या अटकेसाठी श्रीरामपूर, बेलापुरात बंद

पीकनिहाय क्षेत्र (हेक्टरमध्ये) असे :

बाजरी ६,४११, मका २,६१५, तूर ३३५.४०, मूग १२७४.८०, उडीद ९६.२०, इतर खरीप कडधान्ये ६०.८०, भुईमूग ४४५.४०, सोयाबीन ३४८४.२०, कापूस १२,५१८, ऊस ३७३६.१९, चारा पिके ११,३६७.४०, कांदा १३३९.१०, भाजीपाला १८८७.२०, मसाला पिके ३०, औषधी व सुगंधी वनस्पती १९३.८०, फुलपिके ७, फळपिके ५४९.२०.

Farmer
पर्यटन विकासातून चांदपूरला लागावे ‘चारचांद’; सुविधांअभावी हिरमोड

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com