Loksabha Election Voting : अहमदनगर, शिर्डीत मतोत्सव उत्साहात

अहमदनगर व शिर्डी या दोन लोकसभा मतदारसंघासाठी आज शांततेत मतदान पार पडले. अहमदनगरसाठी सुमारे ६१ टक्के, तर शिर्डीसाठी सुमारे ६२ टक्के मतदान झाले, अशी माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी दिली.
Loksabha Election Voting
Loksabha Election Votingsakal

अहमदनगर : अहमदनगर व शिर्डी या दोन लोकसभा मतदारसंघासाठी आज शांततेत मतदान पार पडले. अहमदनगरसाठी सुमारे ६१ टक्के, तर शिर्डीसाठी सुमारे ६२ टक्के मतदान झाले, अशी माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी दिली. अधिकृत आकडेवारी रात्री उशिरापर्यंत जाहीर करण्यात आली नव्हती. मागील (२०१९) च्या निवडणुकीच्या तुलनेत या निवडणुकीच्या मतदानात घट झाली.

काही केंद्रांवर मतदान यंत्रे बंद पडण्याचे प्रकार घडले. ढगाळ हवामानामुळे बहुतेक ठिकाणी उन्हाचा त्रास जाणवला नाही. प्रत्येक मतदान केंद्रांवर वैद्यकीय सुविधा, सावलीसाठी मंडप, पिण्याचे पाणी, मतदानाच्या खोलीमध्ये पंखे, अपंगांसाठी व्हिल चेअर अशा सुविधा करण्यात आल्या होत्या. दोन्ही मतदारसंघासाठी सुमारे पाच हजार पोलिस, तीन हजार होमगार्ड असा फौजफाटा तैनात होता.

सकाळी नऊ वाजेपर्यंत साधारण सहा टक्के, ११ वाजेपर्यंत १४ ते १८ टक्के, दुपारी एक वाजेपर्यंत ३० टक्के, तीन वाजेपर्यंत ४१ ते ४४ टक्के, पाच वाजेपर्यंत ५३ ते ५५ टक्के मतदान झाले होते. नंतर सुमारे ६१ ते ६२ टक्के मतदान झाले. तथापि, अधिकृत आकडेवारी रात्री उशिरापर्यंत जाहीर करण्यात आली नव्हती.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com