मापारी यांच्यावर हल्ला करणाऱ्यांना अटक करा

आनंद गायकवाड
Sunday, 1 November 2020

जिल्हा कॉंग्रेसचे सरचिटणीस व शेतकरी विकास मंडळाचे सक्रीय कार्यकर्ते श्रीकांत तानाजी मापारी (वय 31, रा. लोणी खुर्द, ता. राहाता) हे संगमनेरहून लोणीकडे जाताना, तालुक्‍यातील मेंढवण शिवारात शुक्रवार (ता. 30) रोजी दुपारी 12 च्या सुमारास प्रवरा परिसरातील सात आठ तरुणांनी प्राणघातक हल्ला केला.

संगमनेर (अहमदनगर) : जिल्हा कॉंग्रेसचे सरचिटणीस व शेतकरी विकास मंडळाचे सक्रीय कार्यकर्ते श्रीकांत तानाजी मापारी (वय 31, रा. लोणी खुर्द, ता. राहाता) हे संगमनेरहून लोणीकडे जाताना, तालुक्‍यातील मेंढवण शिवारात शुक्रवार (ता. 30) रोजी दुपारी 12 च्या सुमारास प्रवरा परिसरातील सात आठ तरुणांनी प्राणघातक हल्ला केला. यात ते गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर शहरातील खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. 

मापारी यांनी संगमनेर तालुका पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे, शुक्रवारी दुपारी ते त्यांचे मित्र सागर आहेर व स्वप्निल आहेर यांच्या समवेत संगमनेरहून लोहारे मार्गे लोणीकडे मोटार (एम. एच. 17 बी. एक्‍स. 2889 ) ने जात असताना, मेंढवण येथील निळवंडे कालव्याजवळ पाठीमागून मोटारीतून आलेले रहिमपूर येथील सचिन रघुनाथ शिंदे, रविंद्र आबाजी गाडे, सुशील शिंदे व अनोळखी चार ते पाच जणांनी मला माझ्या कडून अपघात झाला असे सांगून माझ्यावर प्राणघातक हल्ला केला. या मारहाणीत मापारी यांच्या डोक्‍याला व डोळ्याला इजा झाली. याबाबत तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून, हेड कॉंन्स्टेबल विष्णू आहेर तपास करीत आहेत. 

अरुण कडू, राहाता तालुका कॉंग्रेसचे अध्यक्ष रावसाहेब बोठे, डॉ. एकनाथ गोंदकर, सुरेश थोरात, नवनाथ आंधळे, सुभाष निर्मळ, रमेश गागरे, भास्कर फणसे, बापू दिघे, सुमित चौगुले, सचिन गाडेकर, नारायण घोरपडे, तानाजी मापारी, आसिफ इनामदार उपस्थित होते. याबाबत कॉंग्रेस समितीचे शिष्टमंडळ जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांची भेट घेणार आहेत.

संपादन : अशोक मुरुमकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Arrest those who attacked Shrikant Mapari