मित्रच निघाला मारेकरी, गोळीबार करणारा गजाआड

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 15 November 2020

जामखडे तालुक्‍यातील जवळके येथील सटवाई मंदिराजवळील मोकळ्या जागेत शनिवारी (ता.14) सायंकाळी अब्दुल शेख, बारिकराव जावळे व इतर तिघे-चौघे बसले होते.

नगर ः जवळके (ता. जामखेड) शिवारात गावठी पिस्तुलातून मित्रावर गोळीबार केल्याच्या आरोपावरून स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अवघ्या चोवीस तासांत आरोपीस जेरबंद केले.

त्याच्याकडून गावठी पिस्तूल व दोन जीवंत काडतुसे पोलिसांनी जप्त केली. अब्दुल कमाल शेख (वय 30, रा. जवळके, ता. जामखेड) असे त्याचे नाव आहे. या गोळीबारात बारीकराव जावळे जखमी झाले आहेत. 

जामखडे तालुक्‍यातील जवळके येथील सटवाई मंदिराजवळील मोकळ्या जागेत शनिवारी (ता.14) सायंकाळी अब्दुल शेख, बारिकराव जावळे व इतर तिघे-चौघे बसले होते.

त्यावेळी शेख याच्याकडील पिस्तूलमधून अचानक सुटलेली गोळी जावळे यांच्या हाताला लागली. जावळे यांना तातडीने नगरमधील खासगी रुग्णालयात हलविले. याप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेतील पथकाने शेख यास जेरबंद केले.

त्याच्याकडून 25 हजार रुपये किमतीचा गावठी पिस्तूल, दोन जीवंत काडतुसे जप्त केली. पुढील तपासासाठी शेख यास जामखेड पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. अहमदनगर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Arrested for firing on a friend