esakal | शेतकरीनायक शेतीपालक किसान राज्यपुरस्कृत बहुजनाधीश्वर नेत्यांचा नेता जानता राजा शरद पवार साहेब
sakal

बोलून बातमी शोधा

Article on the occasion of Sharad Pawar birthday

आजपर्यंत महाराष्ट्राच्या मातीने अनेक महापुरुषांना जन्म दिला. यामध्ये अनेक राजे, समाजसुधारक, खेळाडु, उद्योजक, नेते किंवा नायक यांचा समावेश होतो. वेगवेगळ्या विभागात उल्लेखनिय काम केलेले अनेक रथी महारथी या महाराष्ट्राच्या मातीत आहेत किंवा होऊन गेले आहेत.

शेतकरीनायक शेतीपालक किसान राज्यपुरस्कृत बहुजनाधीश्वर नेत्यांचा नेता जानता राजा शरद पवार साहेब

sakal_logo
By
सीए लहु काळे

आजपर्यंत महाराष्ट्राच्या मातीने अनेक महापुरुषांना जन्म दिला. यामध्ये अनेक राजे, समाजसुधारक, खेळाडु, उद्योजक, नेते किंवा नायक यांचा समावेश होतो. वेगवेगळ्या विभागात उल्लेखनिय काम केलेले अनेक रथी महारथी या महाराष्ट्राच्या मातीत आहेत किंवा होऊन गेले आहेत.

वेळेनुसार व गरजेनुसार आपण प्रत्येकजण या महापुरुषांच्या भरीव कामामधुन प्रेरणा घेऊन त्यांना वंदन करत असतो. परंतु ज्यांचे काम सदासर्वदा व चिरकाळ मार्गदर्शक आहे, अशा महापुरषांना आपण रोज वंदन  करत असतो व त्यांना स्वतःची अस्मिता बनवत असतो. या अशा भारदस्त व वजनदार व्यक्तीमत्वांमध्ये सर्वप्रथम राजाधिराज छत्रपती शिवाजी महाराजांचे कर्तृत्व सर्वश्रुत व सर्वमान्य आहे. त्यानंतर या महाराष्ट्राला शाहु- फुले- आंबेडकर यांच्या विचारांमुळे पुरोगामी महाराष्ट्राची उपमा मिळाली. 

आजच्या काळांत आपल्या या महाराष्ट्राचे पुरोगामीत्व टिकवुन ठेवणारी अनेक रत्ने या राज्यामध्ये आहेत. या रत्नांमधीलच एक प्रमुख रत्न गेली. ५०- ५५ वर्षांपासुन महाराष्ट्राच्या जनतेच्या मनावर राज्य करत आहे, असा नेता म्हणजे शरद पवार साहेब.

एका सर्वसामान्य खटल्याच्या शेतकरी कुटुंबात जन्मलेला साधारण व्यक्ती फक्त आणि फक्त प्रचंड इच्छाशक्ती व आत्मविश्वासाच्या बळावर सतत संघर्ष करत सबंध समाजासाठी भरीव काम करत आहे. स्वतः च योगदान देत आहे. पवार साहेबांनी केलेल्या अनेक कामांपैकी बरीच कामे शेती विभागाशी निगडीत आहेत. जन्मतःच शेतकरी असल्याने त्यांना शेतीविषयी प्रचंड आवड व ज्ञान आहे. 

साहेब महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना व युपीएच्या २oo४ ते २o१४ या काळांत कोणतंही महत्त्वाचं खातं मिळणाऱ्या नेत्याने 'केंद्रीय कृषी मंत्री' हे खातं मागुन घेऊन शेतीविभागामध्ये भरीव काम केलं. शेतकऱ्यांचं कमी कालावधीत हेक्टरी उत्पादन वाढवण्याच्या दृष्टीकोणातुन बी-बियान्यांची नवनवीन पैदास संशोधन करण्यासाठी देशपातळीवर अनेक कृषी विज्ञान केंद्रांची स्थापना पवार साहेबांच्या काळांत झाली. अन्नधान्याची आयात करणारा भारत देश पवार साहेब कृषीमंत्री झालेपासुन निर्यात करायला लागला. 

दुसरी हरीतक्रांती घडवणारा नेता म्हणुन देश शरद पवारांना ओळखु लागला. वाढलेलं शेती उत्पादन व दर निश्चिती यामध्ये कायम केंद्रस्थानी राहणारा नेता म्हणजे पवार साहेब. शेती उत्पादनाला योग्य बाजारभाव मिळावा म्हणुन सहकार चळवळीतुन अनेक शेतीपुरक व्यवसाय व कारखानदारी मजबुत करणारा नेता म्हणुनसुद्धा पवार साहेब ओळखले जातात. शेतकऱ्यांना शेती समजुन सांगताना पर्यावरणपुरक शेतीची गरज सांगतात व फलोत्पादनाला चालना देतात. तेंव्हापासुन महाराष्ट्र व देश फलोत्पादनात अग्रेसर झाला व फळांची निर्यात करणारा देश ठरला व थोडाफार का होईना पर्यावरण संतुलन राखण्यास हातभार लागला. 

कुठे पुर आला असेल किंवा दुष्काळ पडला असेल तर लगेच तत्परतेने शेतकऱ्यांच्या मदतीला धावुन जाणारा नेता म्हणुन शरद पवारांना ओळखले जाते. संपुर्ण शेतीपद्धती जाणनारा, शेतकऱ्यांच्या भावना जाणुन योग्य निर्णय घेणारा नेता, शेतकरी राज्य मानणारा नेता म्हणुन पवार साहेबांची ओळख आहे.

राजकारनाच्या वेळी राजकारण व जास्तीत जास्त समाजकारन करणारा नेता म्हणुन साहेबांची ओळख आहे. आचरनात सर्वधर्मसमभाव ठेवुन सर्वसामान्य मानसातुन नेता तयार करणारा व्यक्ती. दिनदलीत गोरगरीब बहुजन हिताय बहुजन सुखाय साठी झटणारा लोकनेता. सतत संघर्ष करून सर्वसामान्यांच्या भावना जाणनारा जाणता राजा म्हणजे शरद पवार साहेब. म्हणुनंचं लेखाला दिलेले शिर्षकानुसार शरद पवार साहेबांना शेतकरीनायक शेतीपालक किसानराज्यपुरस्कृत बहुजनाधीश्वर नेत्यांचा नेता जानता राजा म्हटले तर चुकीचे ठरणार नाही. अशा या पोलादी विचाराच्या व निधड्या योध्याच्या ८१व्या वाढदिवसानिमित्त लेख लिहण्याचे भाग्य मला लाभले याचा मला मनस्वी खुप खुप आनंद व अभिमान होत आहे. अशा या महाराष्ट्राच्या पोलादी पुरुषाला वाढदिवसानिमित्त खुपसाऱ्या शुभेच्छा. साहेब शतायुषी व्हा! दिर्घायुषी व्हा!

powerat80

संपादन : अशोक मुरुमकर