esakal | अरुणोद्य मिल्ककडून दूध उत्पादक शेतकऱ्यांना दिवाळी फराळ व लाभांश वाटप
sakal

बोलून बातमी शोधा

Arunodya Milk distributes Diwali fares and dividends to milk producing farmers

कोरोना प्रदूर्भावात शेतकऱ्यांना दिलासा देत दूध उत्पादकांना आधार देण्याचे काम अरुणोदयने केले आहे.

अरुणोद्य मिल्ककडून दूध उत्पादक शेतकऱ्यांना दिवाळी फराळ व लाभांश वाटप

sakal_logo
By
नीलेश दिवटे

कर्जत (अहमदनगर) : कोरोना प्रदूर्भावात शेतकऱ्यांना दिलासा देत दूध उत्पादकांना आधार देण्याचे काम अरुणोदयने केले आहे. मिळालेल्या लाभांशमुळे त्यांची दिवाळी गोड होईल, असे प्रतिपादन नागवडे कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे यांनी केले.

तालुक्यातील टाकळी खंडेश्वरी येथे पाटील परिवाराच्या वतीने आयोजित अरुणोदय मिल्ककडून दूध उत्पादक शेतकरी मेळावा, दिवाळी फराळ आणि लाभांश वाटप कार्यक्रमात अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. यावेळी काँग्रेसचे जिल्हाउपाध्यक्ष प्रवीण घुले, तालुकाध्यक्ष प्रा. किरण पाटील, बापूसाहेब काळदाते, दुग्धव्यसाय मार्गदर्शक डॉ. सी. एन. भट, संतोष राजेभोसले, सतीश थेटे, अमोल पाटील, दीपक कोल्हे, दत्तात्रय गायकवाड, दत्ता डुंबल, दिलीप चांडे आदी उपस्थित होते.

नगर जिल्ह्यातील बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
प्रवीण घुले म्हणाले, शेतीला जोड धंदा म्हणून दुग्ध व्यवसाय शेतकऱयानी निवडला. मात्र काही अडचणी आल्या. मात्र अरुणोदय सारख्या संस्थामुळे पुन्हा उर्जित अवस्था येईल. प्रा. किरण पाटील म्हणाले, कोरोना प्रदूर्भावात टाकळी येथील संस्थेच्या सर्व दूध उत्पादकांनी एक लाख अकरा हजार रुपयांची मदत मुख्यमंत्री सह्ययता निधीस मदत म्हणून आमदार रोहित पवार यांचे हस्ते प्रदान केली. राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली संस्था प्रगती पथावर आहे. 

यावेळी बापुसाहेब काळदाते यांचे भाषण झाले.या वेळी सभासदांना अठरा लाखाचा लाभांश चे वाटप करण्यात आले. संतोष ढोबे व आकाश कासार यांनी सूत्रसंचालन केले तर अमोल पाटील यांनी आभार मानले.तत्पूर्वी कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी भेट देत शुभेच्छा दिल्या.

संपादन : अशोक मुरुमकर