ज्योतिष तज्ज्ञ उमाकांत पुरकर यांचे निधन

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 3 November 2020

या विव्दत्तेचे भंडार त्यांनी आपला एकमेव विद्यार्थी प्रसिध्ध ज्योतिष तज्ञ संतोष घोलप शिकण्यासाठी नेहमी खुले ठेवले होते व त्यांतुन त्यांनी सतत 12 वर्ष आनेक गहण ज्योतिष पध्धतीचे शिक्षण संतोष घोलप यांना दिले होते.

नगर  ः चक्रीय अष्टकवर्गाचे अभ्यासक, ज्योतिषी उमाकांत वामनराव पुरकर यांचे वृध्दापकाळाने निधन झाले. ते 70 वर्षाचे होते. त्यांच्या पत्नी, मागे दोन मुले, सुना, नातवंडे, तीन भाऊ असा परीवार आहे.
उमाकांत पूरकर हे चक्रीय अष्टकवर्ग ज्योतिषसारख्या अत्यंत प्राचीन ज्योतिष पध्दतीचे गाढे अभ्यासक होते.

20 व्या शतकातील देशातील सर्वात अभ्यासू ज्योतिष तज्ज्ञांमध्ये गणले जात होते. अंधश्रद्धा मोडीत काढून ग्रहताऱ्यांचा मानवीय जीवनावर होणारा परिणामांचा सखोल  अभ्यास त्यांनी केला होता. त्यांचे ज्योतिष कथन अचूक होते. 

या विद्वतेचे भांडार त्यांनी आपला एकमेव विद्यार्थी प्रसिध्द ज्योतिष तज्ज्ञ संतोष घोलप शिकण्यासाठी नेहमी खुले ठेवले होते. त्यातुन त्यांनी सतत 12 वर्ष अनेक गहन ज्योतिष पध्दतीचे शिक्षण संतोष घोलप यांना दिले होते. आता त्यांच्यामागे संतोष घोलप हे चक्रीय अष्टकवर्ग या ज्योतिष पध्धतीचे एकमेव जाणकार राहिले आहेत.

ज्योतिष शास्रातील सुर्य मावळला
माझ्या गुरूंनी नेहमी समाजाला निस्वार्थी भावनेतून योग्य दिशा देण्याचे कार्य केले आहे. आज ज्योतिष शास्रातील तेजस्वी सूर्य मावळला आहे.  त्यांच्या आत्माला शांती मिळो हि ईश्वरचरणी प्रार्थना.

-संतोष घोलप, चक्रीय अष्टक वर्गाचे ज्योतिष तज्ज्ञ, प्रमुख, छत्रपती ज्योतिष समुह


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Astrologer Umakant Purkar passes away