

Young Achiever: Sakshi Rahinj Soars into Indian Air Force at 19
sakal
-राजू नरवडे
संगमनेर: जिद्द, चिकाटी आणि अपार कष्ट करण्याची तयारी असेल तर कोणतेही स्वप्न अशक्य नाही, हे पिंपरणे (ता. संगमनेर) येथील साक्षी बाबासाहेब राहिंज हिने आपल्या कर्तृत्वातून सिद्ध करून दाखवले आहे. अवघ्या १९ व्या वर्षी साक्षीची चेन्नई येथे इंडियन एअर फोर्सच्या टेक्निकल विभागात निवड झाली असून, संपूर्ण महाराष्ट्रातून निवड झालेल्या केवळ चार मुलींमध्ये तिचा समावेश आहे. या यशामुळे पिंपरणे गावात आनंदाचे वातावरण निर्माण झाले.