
पाथर्डी : मोहोज देवढे येथील ८१ वर्षीय शेतकरी विक्रम सातोबा दहिफळे यांची दोन लाख ३२ हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. ही फसवणूक त्यांच्या शेतामधील कामासाठी ठेवण्यात आलेल्या अब्दुल खान ऊर्फ बाजी मेहेद्र खान (रा. चुक्कती, ता. मोघा, पंजाब) याने केली असल्याची तक्रार दहिफळे यांनी केली आहे.