esakal | कांडेकर खून खटला ः पॅरोलवर सुटलेल्या कैद्याची गळा चिरून हत्या
sakal

बोलून बातमी शोधा

क्राईम न्यूज

कांडेकर खून खटला ः पॅरोलवर सुटलेल्या कैद्याची गळा चिरून हत्या

sakal_logo
By
मार्तंड बुचुडे

पारनेर - पारनेर तालुका हत्याकांडाने पुन्हा एकदा हादरला आहे. नारायणगव्हाण परिसर पुन्हा चर्चेत आला आहे. नारायणगव्हाण सेवा संस्थेचे तत्कालीन अध्यक्ष प्रकाश कांडेकर यांची नगर-पुणे रस्त्यावर हत्या झाली होती. त्या प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या राजाराम शेळके यांच्यावर हल्ला झाला. हल्लेखोरांनी त्यांचा गळा चिरून हत्या केली.(Attack on accused Shelke at Narayangavan)

सध्या कोरोना संसर्ग वाढल्याने अनेक कैद्यांना पॅरोलवर सोडण्यात आले होते. त्यात शेळके यांचीही सुटका केली होते. ते शेतात काम करीत असताना त्यांच्यावर हल्ला झाल्याचे पोलिस सूत्रांनी सांगिले.

प्रकाश कांडेकर हे नारायणगव्हाण सेवा संस्थेचे अध्यक्ष होते. त्यांची नगर-पुणे रस्त्यावर राजकीय वादातून गोळ्या झाडून हत्या झाली होती. त्या प्रकरणात शेळके आरोपी होते. या प्रकरणात एकूण चौदा आरोपींना शिक्षा लागली आहे. शेळके हेही राजकीय पुढारी होते. त्यांनी गावचे सरपंचपद भूषवले होते.

शेळके हे संचित रजेवर असल्याने नारायणगव्हाण येथील आपल्या शेतात काम करीत होते. दुपारच्यावेळी त्यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी हल्ला केला. त्यात शेळके यांच्या मानेला जबर जखम झाली आहे. त्यांना शिरूर येथे खासगी रूग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले. परंतु त्यापूर्वीच त्यांचे निधन झाले.

शेळके यांची हत्या नेमकी कोणी केली. याचा तपास पोलिस करीत आहेत. राजकीय वाद की अन्य कोणते कारण याचाही तपास केला जात आहे. Attack on accused Shelke at Narayangavan