esakal | तहसीलदार ज्योती देवरे यांच्या वाहनावर वाळूची गाडी घालण्याचा प्रयत्न
sakal

बोलून बातमी शोधा

Attempt to put sand cart on Tehsildar Jyoti Deore vehicle

नगर- कल्याण महामार्गावरील टाकळी ढोकेश्वर (ता. पारनेर) येथे सायंकाळी तहसिलदार ज्योती देवरे यांच्या वाहनावर भरलेली वाळुची गाडी घालण्याचा प्रयत्न झाला आहे.

तहसीलदार ज्योती देवरे यांच्या वाहनावर वाळूची गाडी घालण्याचा प्रयत्न

sakal_logo
By
सनी सोनावळे

टाकळी ढोकेश्वर (अहमदनगर) : नगर- कल्याण महामार्गावरील टाकळी ढोकेश्वर (ता. पारनेर) येथे सायंकाळी तहसिलदार ज्योती देवरे यांच्या वाहनावर भरलेली वाळुची गाडी घालण्याचा प्रयत्न झाला आहे.
तहसिलदार ज्योती देवरे या गुरुवारी सायंकाळी कर्जुले हर्या येथील कोवीड सेंटरला भेट देऊन नगर कल्याण महामार्गावरून टाकळी ढोकेश्वर येथुन पारनेरकडे निघाल्या. गावातील त्रिमूर्ती पेट्रोल पंपावर मोठ्या ट्रकमधुन खाली पाणी पडताना दिसले. यात निश्चित वाळु असल्याची खात्री देवरे यांना झाली.

देवरे यांनी चालकास आपले वाहन त्या दिशेने घेण्यास सांगितले. असता वाळुवरील वाहन चालकाने वाळुचा भरलेला हायवा देवरे यांच्या गाडीवर घालण्याचा प्रयत्न करून आपले वाहन नगर कल्याण महामार्गावरून वासुंदे गावाच्या दिशेने मोठ्या जलद गतीने नेण्यास सुरवात केली. देवरे यांनीही त्याच दिशेने आपले वाहन नेत त्या वाळु भरलेल्या वाहनाचा पाठलाग केला.

वाळु भरलेल्या वाहनाचा वेग इतका मोठ्या प्रमाणात होता की पुढुन एखादे वाहन आले आसते मोठा अपघात देखील होण्याची शक्यता होती. याचे या घटनेचे चित्रीकरण देखील मोबाईलवर करण्यात आले. वाळुचालक वाहन जलद गतीने ढोकेश्वर रोडकडे घेऊन जाण्यास यशस्वी झाला. मात्र गाडीचा नंबर घेतल्याने मालक व चालकाचा तपास घेण्यात येत असुन त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.

संपादन : अशोक मुरुमकर