आत्महत्या करण्याच्या प्रयत्नात त्याच्या शरीराचे झाले दोन तुकडे !

अकोले तालुक्यातील पिंपळगाव निपाणी येथील एका शेतकऱ्याने विहिरीत गळफास घेतला
suicide
suicide sakal media
Updated on

अकोले : अकोले तालुक्यातील पिंपळगाव निपाणी येथील एका शेतकऱ्याने विहिरीत गळफास घेतला. गळफास घेताना दोरीने मुंडके (डोके) बाजूला आणि गळ्यापासून पाया पर्यंतचे शरीर दुसऱ्या बाजूला झाले, अशी विचित्र घटना घडली. यामुळे पोलिसांना आता पी एम व पंचनाम्यासाठी मुंडके (डोके) शोधण्याची वेळ आली आहे.

suicide
मालकाच्या घरीच 'गांजाचा बादशाह'; नितेश राणेंची खोचक टिका

या घटनेत मयत झालेल्या व्यक्तीचे नाव भाऊसाहेब दाजीबा तोरमल (वय ४५ वर्ष ) रा.पिंपळगाव निपाणी तालुका अकोले जिल्हा अहमदनगर असे आहे. ही घटना आज रविवारी दुपारी १२ वाजण्याच्या दरम्यान घडली मयत भाऊसाहेब तोरमल याचे घर या विहिरीपासून दोनशे ते तीनशे मीटर अंतरावर आहे. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर ग्रामस्थांनी ही माहिती पोलीस पाटिल यांना दिली त्यांनी पोलीस यंत्रणाकडे तात्काळ खबर दिल्यानंतर सर्व यंत्रणा या ठिकाणी हजर झाली

दुपारी ३ वाजता मयत व्यक्तीचे मुंडके नसलेले शरीर बाहेर काढण्यात आले . मात्र त्याचे मुंडके ( डोक्याचा) शोध घेण्याचे काम सुरू आहे त्यासाठी विहिरीचे पाणी उपसा करण्याचे काम सुरू आहे पाण्याचा उपसा झाल्यानंतर मयत तोरमल याच्या मुंडक्या चा शोध लागणार आहे. अकोले पोलीस ठाण्यातअकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे. सुमारे 60 ते 70 फूट खोल असणाऱ्या विहिरीत 40 फूट पाणी असून या पाण्यात त्याचे मुंडके शोधण्याचे काम सुरू आहे मुंडके नसलेले शरीर पाण्यातून वर काढले असून ते शरीर ग्रामीण रुग्णालय अकोले येथेतपासणीसाठी ठेवले असल्याचे अकोल्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक मिथुन घुगे यांनी सांगितले. मयत भाऊसाहेब तोरमल हे सकाळपासून बेचैन होते व्यसनाधीनतेमुळे त्यांनी आत्महत्या केली असावी असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

suicide
Share Marketने मोडले सगळे रेकॉर्ड्स; Sensex 61,800च्या पार

आज दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास ते आपल्या घराच्या जवळच असणाऱ्या विहिरी कडे गेले विहिरीच्या कठड्याला एक नायलॉन दोरी बांधली. आणि आपल्या गळ्यात अडकविली त्यानंतर विहिरीच्या कठड्यावरून थेट विहिरीत उडी मारली विहिरीत उडी मारताच गळफासच्या दोरीने त्याचे मुंडके आणि मुंडके नसलेले शरीर असे दोन तुकडे झाले. गळफासाची दोरीने त्याचा गळा कापल्यामुळे शरीराचे दोन भाग झाले आणि विहिरीत पडले आत्महत्या करण्यापूर्वी त्याचे अंगात फक्त अंतवस्त्र होते.

suicide
काश्मीरच्या जंगलातील घातक एन्काऊंटरमध्ये पाकिस्तानी कमांडोज?

पाण्यात काहीतरी पडल्याचा आवाज आल्याने पत्नीने धाव घेतली असता पतीने आत्महत्या केल्याची धक्कादायक माहिती तिला समजली तिने आरडाओरडा केला असता स्थानिक नागरिकांनी या ठिकाणी धाव घेतली. मयत तोरमल यांचा मृतदेह दुपारी तीन वाजता विहिरीतून बाहेर काढला असून त्याचे मुंडके नसलेले शरीर पोलिसांनी अकोले ग्रामीण रुग्णालयात तपासणीसाठी उत्तरीय तपासणीसाठी ठेवले आहे. मात्र त्याचे मुंडके विहिरीतून अद्याप काढता आले नाही. विहिरीत 30 ते 40 फूट पाणी असल्याने विहिरीतील पाणी उपसा करण्याचे काम सुरू आहे. मुंडके मिळाल्यानंतरच त्याच्या शरीराचा पोस्टमार्टम करता येणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com