esakal | राहुरीतील वाळूसाठ्याच्या लिलावाच्या हालचाली
sakal

बोलून बातमी शोधा

Auction movements for sand in Rahuri

राहुरी, राहाता, श्रीरामपूर, कोपरगाव येथील तहसील कार्यालयांमध्ये नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात पर्यावरणविषयक जाहीर लोकसुनावणी शासकीय नियमांचे पालन करून होणार आहे. 

राहुरीतील वाळूसाठ्याच्या लिलावाच्या हालचाली

sakal_logo
By
विलास कुलकर्णी

राहुरी : जिल्ह्यातील मुळा, प्रवरा, गोदावरी नद्यांचे पाणी कमी होताच जिल्हा प्रशासनाने पात्रातील वाळू घाटांच्या लिलावासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. जिल्ह्यातील 23 ठिकाणच्या वाळू घाटांच्या लिलावाचे प्रस्ताव महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे दाखल झाले आहेत. 

राहुरी, राहाता, श्रीरामपूर, कोपरगाव येथील तहसील कार्यालयांमध्ये नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात पर्यावरणविषयक जाहीर लोकसुनावणी शासकीय नियमांचे पालन करून होणार आहे. 

जिल्हा प्रशासनाकडून अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांतर्फे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या उपप्रादेशिक कार्यालयात 23 वाळू घाटांचे प्रस्ताव मागील महिन्यात दाखल केले आहेत. त्यानुसार उपप्रादेशिक अधिकारी संजीव रेदासनी यांनी पर्यावरणविषयक जाहीर लोकसुनावणीची सूचना जाहीर केली.

तीन नोव्हेंबर रोजी सकाळी अकरा वाजता राहुरी येथे व दुपारी तीन वाजता श्रीरामपूर येथे, तसेच पाच नोव्हेंबर रोजी सकाळी अकरा वाजता राहता येथे आणि दुपारी तीन वाजता कोपरगाव येथे तहसीलदार कार्यालयात पर्यावरणविषयक लोकसुनावणी होणार आहे. तीत लेखी स्वरूपात सूचना व तक्रारी मागविण्यात आल्या आहेत. 

तालुकानिहाय वाळू घाटांच्या लिलावाची ठिकाणे 
राहुरी (मुळा व प्रवरा नदी) ः पिंप्री वळण, राहुरी खुर्द, वळण, चंडकापूर, रामपूर व सात्रळ. राहाता (प्रवरा नदी) ः पुणतांबे व रस्तापूर. श्रीरामपूर (प्रवरा नदी) ः वांगी खुर्द, नायगाव (क्रमांक एक व क्रमांक दोन), मातुलठाण (क्रमांक एक, दोन, तीन). कोपरगाव (गोदावरी नदी) ः कोकमठाण, संवत्सर, कोळगाव थडी, जेऊर, सोनारी, पाटोदा, सांगवी भुसार, सुरेगाव व गोधेगाव. 

संपादन - अशोक निंबाळकर