अगस्ती कारखाना अकोल्याची भाग्यलक्ष्मी - पिचड

शांताराम काळे
Saturday, 14 November 2020

ऊसतोड मजुरांशी संपर्क साधून त्यांच्यासाठी 50 बेडची व्यवस्था केली. सर्व संचालकांनीही पूजन केले.

अकोले : अगस्ती कारखाना तालुक्‍याचा भाग्यलक्ष्मी आहे. त्याला स्वयंपूर्ण करण्यासाठी ऊस उत्पादक, सभासद, कारखान्याचे पदाधिकारी, अधिकारी, संचालक प्रामाणिकपणे प्रयत्न करत आहेत. अगस्ती पूर्ण क्षमतेने चालेल.

इथेनॉल प्रकल्प निर्मिती केल्यास सभासदांना त्याचा निश्‍चित फायदा होईल, अशी खात्री देतानाच कोरोनाला सहज घेऊ नका, काळजी घ्या, असे आवाहन माजी मंत्री व अगस्ती कारखान्याचे अध्यक्ष मधुकर पिचड यांनी केले. 

लक्ष्मीपूजन असल्याने सकाळी आठ वाजता कारखाना कार्यस्थळावर त्यांनी लक्ष्मी पूजन केले. त्यांच्यासमवेत उपाध्यक्ष व जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष सीताराम गायकर, माजी आमदार वैभव पिचड, अशोक देशमुख, प्रकाश मलुंजकर, सीताराम भांगरे, मच्छिंद्र धुमाळ, महेश नवले, बाळासाहेब ताजने, मिनानाथ पांडे, गुलाब शेवाळे, राजेंद्र डावरे, कार्यकारी संचालक भास्कर घुले उपस्थित होते. 

ऊसतोड मजुरांशी संपर्क साधून त्यांच्यासाठी 50 बेडची व्यवस्था केली. सर्व संचालकांनीही पूजन केले. माजी मंत्री मधुकर पिचड यांनी तालुक्‍यातील तमाम जनतेला दिवाळीच्या शुभेच्छा देताना कोरोनाबाबत सतर्क राहावे, गर्दी टाळावी असे आवाहन केले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Augusta Factory Akola's Bhagyalakshmi