मुलाचा अत्याचार, पित्याने बनविला व्हिडिओ, तर आई बनली राखणदार! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Aurangabad

मुलाचा अत्याचार, पित्याने बनविला व्हिडिओ, तर आई बनली राखणदार!

औरंगाबाद : मुलाने एका अल्पवयीन मुलीवर तिच्या घरी जाऊन अत्याचार केला, तर ही घटना त्याच्या पित्याने छायाचित्रित केली, इतकेच नव्हे तर नराधम मुलाच्या या कृत्यासाठी चक्क त्याची आई पीडितेच्या दरवाजावर राखणदार राहिली. हा किळसवाणा प्रकार नारेगाव परिसरात उघडकीस आला. हा प्रकार १४ ते १८ फेब्रुवारीदरम्यान घडला. विशेष म्हणजे पीडितेच्या आईवडिलांना ठार मारण्याची, व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन अत्याचार केल्यानंतर मुलगी साडेचार महिन्यांची गर्भवती राहिली. अखेर ‘ती’ने पोलिसांत धाव घेत तक्रार दिल्याने नराधम मुलगा, त्याचे आई-वडील अशा तिघांविरोधात एमआयडीसी सिडको पोलिसांत पोक्सोसह अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला.

याप्रकरणी नारेगाव भागातील साडेसोळावर्षीय पीडितेने पोलिसांत दिलेल्या फिर्यादीनुसार, आरोपी रिजवान सय्यद मुनाफ (२१), त्याचा पिता आरोपी जफर (वय ५०) आणि आरोपी आई शमीमबी सय्यद मुनाफ (४६, रा. तिघेही पटेलनगर, फातिमा मशीदजवळ, नारेगाव) अशी त्यांची नावे आहेत.

दाखल फिर्यादीनुसार अल्पवयीन पीडितेचे आईवडील मातीकाम करतात. नववीपर्यंत शिक्षण झाल्यापासून पीडिता घरीच राहते. आरोपी कुटुंबीय तिच्या ओळखीचे आहे. १४ फेब्रुवारीला दुपारी आरोपी मुलगा पीडिता घरी एकटी असल्याची संधी साधत तिच्या घरी गेला. तिच्याशी लगट करत बळजबरीने अत्याचार केला, इतकेच नव्हे तर लगोलग ५० वर्षीय आरोपी पित्याने स्वतःचा मुलगा अत्याचार करत असताना चक्क छायाचित्रीकरण केले, तर त्याच वेळी पीडितेच्या घरी कोण येते का, यासाठी आरोपी आई शमीमबी सय्यद ही पीडितेच्या घराच्या दरवाजावर राखणदार राहिली.

दरम्यान पीडितेने आरडाओरड करू नये म्हणून आरोपी पित्याने तिला चाकू दाखवून ठार मारण्याची धमकी दिली. इतकेच नव्हे तर सदरची घटना कोणाला सांगितल्यास व्हिडिओ नातेवाइकांत व्हायरल करेन, पीडितेच्या आईवडिलांना ठार मारून टाकीन अशी धमकी दिल्याने पीडिता गप्प बसली. दरम्यान ती साडेचार महिन्यांची गर्भवती राहिल्याने हा प्रकार उजेडात आला. पुढील तपास उपनिरीक्षक प्रतिभा आबुज करत आहेत.

विनयभंगाचा गुन्हा होता दाखल

याप्रकरणी एमआयडीसी सिडको पोलिस ठाण्याचे निरीक्षक विठ्ठल पोटे यांनी ‘सकाळ’शी बोलताना सांगितले की, आरोपी मुलगा हा बांधकाम मिस्त्री म्हणून काम करतो, तर त्याचे वडीलही सेंट्रिंगचे काम करतात. आरोपी आई ही घरकाम करते. जवळपास अडीच महिन्यांपूर्वी आरोपी मुलगा रिजवान सय्यद याने पीडितेची छेड काढल्याने त्याच्याविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. यात त्याला अटकही झाली होती. दरम्यान १६४ च्या जबाबात तिने हा प्रकार सांगितला नसल्याचेही समोर आले आहे.

Web Title: Aurangabad Minor Girl Was Molested At Home Child Abuse

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top