
Ahmednagar : औरंगजेबाचे पोस्टर झळकावणाऱ्यांवर मोठी कारवाई! नेमकं काय घडलं?
अहमदनगर शहरातील फकीरवाडा येथे संदलदरम्यान औरंगजेबाचे पोस्टर झळकवल्याचा प्रकार समोर आला होता.या प्रकराची गंभीर दखल घेत विवीध कलमांतर्गत चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अहमदनगर शहराचे नामांतर झाल्यानंतर एका मिरवणुकीत औरंगजेबाचे पोस्टर्स हातात घेऊन नाचत असल्याचा व्हिडीओ सोशल मीडियीवर व्हायरल झाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे.
या मिरवणूकीदरम्यान वेळीदोन समाजात तेढ निर्माण होईल अशा घोषणा देखील देण्यात आल्याचे समोर आले आहे. दरम्यान या प्रकारानंतर औरंगजेबाचे पोस्टर झळकवणाऱ्यांना माफी नाही अशी प्रतिक्रिया राज्याचे उपमुख्यमंत्र देवेंद्र फडणवीस यांनी दिली होती. त्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे. साम टीव्हीने याबद्दलचे वृत्त दिले आहे.
औरंगाबाद, उस्मानाबादच्या नामांतरानंतर आता अहमदनगर शहराचे देखील नाव बदलण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला.या घोषणेनंतर अहमदनगरचं नाव अहिल्यादेवी होळकर नगर असं करण्यात आलं आहे. या नृदरम्यान सोशल मीडियावर औरंगजेबाचे पोस्टर्स झळकावण्यात आल्याचा व्हिडीओ समोर आला आहे. त्यामुळं आता यावरून नवा वाद पेटण्याची शक्यता आहे.
फडणवीस काय म्हणाले?
महाराष्ट्रात कुणी औरंग्याचं नाव घेत असेल तर त्याला माफी दिली जाणार नाही, त्या व्हायरल व्हिडिओची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेl. तसेच या प्रकरणातील दोषींवर कारवाई केली जाईल अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीसांनी दिली.
तसेच महाराष्ट्रात कोणी औरंगजेबाचे पोस्टर झळकावत असेल तर ते मान्य केलं जाणार नाही. छत्रपती शिवाजी महाराज हेच महाराष्ट्राचे आराध्यदैवत आहेत. त्यामुळं कुणी असं कृत्य केलं असेल तर त्याच्यावर कारवाई केली जाणार असेही त्यांनी सांगितलं.
अहमदनगरच्या नामांतराचा प्रस्ताव शिंदे फडणवीस सराकारकडून राज्य सरकारच्या मंजूरीनंतर केंद्राकडे पाठवला आहे. केंद्र सरकारच्या मंजूरीनंतर अहमदनगरच्या नामांतराची प्रक्रिया पूर्ण होईल.