
नगर तालुका : लहानपणापासून अधिकारी होण्याची जिद्द. मनाशी जिद्द बाळगून स्वप्नाला सत्यात उतरवण्यासाठी रात्रंदिवस अभ्यास केला. स्पर्धा परीक्षांची तयारी सुरू केली. सुरुवातीला सहा महिन्यांपूर्वी जलसंपदा विभागात वर्ग तीनपदी नियुक्ती मिळाली. चार महिन्यांपूर्वी जलसंधारण विभागात वर्ग दोन पदांवर व आता शुक्रवारी लागलेल्या निकालात राजपत्रित अधिकारी म्हणून नियुक्ती मिळाली. मनाशी बाळगलेली जिद्द पूर्ण झाल्याने व स्वप्न सत्यात उतरल्याचा आनंद अवर्णनीय असल्याची प्रतिक्रिया केडगाव येथील मयुरी संजय रासकर हिने व्यक्त केला.