esakal | महिला बचत गटांना बळ देणाऱ्या शालिनीताई विखे पाटलांना पुरस्कार
sakal

बोलून बातमी शोधा

Award to Shalinitai Vikhe Patil for strengthening women's self-help groups

""हा पुरस्कार माझ्या महिला सहकाऱ्यांना समर्पित करते. या चळवळीत योगदान देणाऱ्या महिलांना आत्मनिर्भरतेने पुढे जाण्यासाठी पुरस्कारामुळे प्रेरणा मिळाली.''  

महिला बचत गटांना बळ देणाऱ्या शालिनीताई विखे पाटलांना पुरस्कार

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

लोणी : महिला बचतगट चळवळीत मोठे योगदान देणाऱ्या, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष शालिनीताई विखे पाटील यांना मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमीच्या वतीने "आदर्श व्यावसायिक उद्योजकता' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. 

ऑनलाइन पद्धतीने झालेल्या राज्यस्तरीय गौरव सोहळ्यात पुरस्काराचे वितरण करण्यात आले. अकादमीचे संस्थापक अध्यक्ष ऍड. कृष्णाजी जगदाळे या वेळी उपस्थित होते.

हेही वाचा - नगर-पुणे जिल्ह्यासाठी ही आहे गुड न्यूज

शालिनीताई विखे पाटील यांनी जनसेवा फाउंडेशनच्या माध्यमातून महिला बचतगट चळवळ यशस्वी केली. दहा हजारांपेक्षा जास्त महिलांचे संघटन या चळवळीशी जोडले गेले. घरगुती उत्पादने, तसेच फुलांपासून उदबत्ती तयार करण्याच्या संकल्पनेला व्यावसायिकतेची जोड देत, ग्रामीण आणि शहरी भागातील महिलांना उद्योग, रोजगाराच्या संधी निर्माण करून दिली. यातून बचतगटांच्या उत्पादनाचा नगर जिल्ह्याचा स्वतंत्र "ब्रॅंड' निर्माण झाला. विखे पाटील यांच्या या कामाची दखल घेऊन त्यांना वरील पुरस्कार देण्यात आला. 

""हा पुरस्कार माझ्या महिला सहकाऱ्यांना समर्पित करते. या चळवळीत योगदान देणाऱ्या महिलांना आत्मनिर्भरतेने पुढे जाण्यासाठी पुरस्कारामुळे प्रेरणा मिळाली.''  

- शालिनीताई विखे पाटील, माजी अध्यक्ष जिल्हा परिषद, अहमदनगर.

संपादन - अशोक निंबाळकर

loading image
go to top