esakal | कोरोनाबाबत जनजागृतीचा नवीन फंडा; नगर जिल्हा परिषदेचा कोरोना रोखण्यासाठी प्रयत्न
sakal

बोलून बातमी शोधा

Awareness on social media through video from Nagar Zilla Parishad

जिल्हा परिषदेने कोरोनाबाबत जनजागृती करण्याचे काम हाती घेतले आहे. सोशल मीडियावर कोरोनाच्या प्रादुर्भावात जनतेने काय काळजी घ्यायची याची माहिती व्हीडीओच्या माध्यमातून देण्यास सुरुवात केलेली आहे.

कोरोनाबाबत जनजागृतीचा नवीन फंडा; नगर जिल्हा परिषदेचा कोरोना रोखण्यासाठी प्रयत्न

sakal_logo
By
दौलत झावरे

नगर : जिल्हा परिषदेने कोरोनाबाबत जनजागृती करण्याचे काम हाती घेतले आहे. सोशल मीडियावर कोरोनाच्या प्रादुर्भावात जनतेने काय काळजी घ्यायची याची माहिती व्हीडीओच्या माध्यमातून देण्यास सुरुवात केलेली आहे.

कोरोना विषाणूचा कहर वाढत चालला आहे. त्याला अटकाव करण्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न सुरु आहेत. परंतु प्रादुर्भाव वाढत चालला आहे. त्याला अटकाव करण्यासाठी जिल्हा परिषद प्रशासनाने पुढाकार घेतलेला आहे. जिल्ह्यातील ग्रामीण भागातील जनतेचे प्रबोधन करण्याची संकल्पना मुख्य कार्यकारी अधिकारी शिवराज पाटील यांच्या सूचल्यानंतर त्यांनी हे काम करण्याची जबाबदारी जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागातील उपमुख्य कार्यकारी अधिकारी निखीलकुमार ओसवाल यांच्यावर सोपविली. 

नगर जिल्ह्यातील बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
ओसवाल यांनी त्यासाठी पुढाकार घेत अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या मार्गदर्शनानुसार जिल्हा परिषदेचे अध्यक्ष, उपाध्यक्षांसह विषय समित्यांचे सर्व सभापती, मुख्य कार्यकारी अधिकारी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी व जिल्हा आरोग्यधिकारी यांचे संदेशाचे व्हीडीओ तयार करून त्याची क्‍लीप तयार केलेली आहे. ही क्‍लिप ग्रामपंचायत विभागातर्फे सर्व गावांमध्ये पोहचवून जनतेची जनजागृती मोहिम हाती घेतली आहे. या मोहिमेत जनतेने कोरोना संदर्भात काय काळजी घेतली पाहिजे याचे मार्गदर्शन करण्यात येत आहे. राज्यात कोरोनाची जनजागृती करणारी नगरची जिल्हा परिषद पहिलीच ठरलेली आहे. 

मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या संकल्पनेनुसार जनजागृतीचे व्हीडीओ तयार केलेले असून त्या माध्यमातून जनतेचे प्रबोधनाचे काम हाती घेण्यात आलेले आहे. हे प्रबोधनाचे व्हीडीओ ग्रामसेवकांसह सर्वांनी जनतेपर्यंत पोहविल्यास त्याचा निश्‍चित फायदा होणार आहे. 
- निखीलकुमार ओसवाल, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद 

संपादन : अशोक मुरुमकर