Ahilyanagar Crime: 'हॉटेल मालकावर हल्ला करणाऱ्यांचा जामीन फेटाळला'; जेवणाच्या बिलाच्या वादातून खुनी हल्ला
आरोपी गणेश संजय म्हस्के व सोमनाथ मच्छिंद्र लवांडे हे इतर आरोपींसमवेत आले व जेवणाच्या बिलावरून भांडण झाले. त्या भांडणात आम्ही तुमचा काटा काढून तुम्हाला जीवे ठार मारतो, असे म्हणून ते तेथून निघून गेले व संध्याकाळी ६ वाजता इतर तीन आरोपींबरोबर आले.
अहिल्यानगर : जेवणाच्या बिलाच्या वादातून हॉटेल मालकावर खुनी हल्ल्यातील दोन आरोपींचा अटकपूर्व जामीन अर्ज जिल्हा सत्र न्यायालयाने फेटाळला आहे. आरोपी गणेश संजय म्हस्के व सोमनाथ मच्छिंद्र लवांडे यांचा जामीन अर्ज फेटाळला आहे.