
संगमनेर : संगमनेर तालुक्यासह पठारभागात बुधवारी दुपारी विजांच्या कडकडाटासह वादळी वारे आणि अवकाळी पावसासह झालेल्या गारपिटीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. यामुळे नुकसानग्रस्त पिकांचे तातडीने पंचनामे करण्यात यावे, अशी मागणी माजी कृषिमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केली आहे.