संगमनेर : संगमनेर तालुक्याला संघर्षाचा व सुसंस्कृत राजकारणाचा इतिहास आहे. मात्र, अलीकडे तालुक्यातील वातावरण दूषित करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. दमदाटी, दांडगाई करणाऱ्यांना वेळीच थांबवले नाही, तर परिणाम गंभीर होतील. अशा प्रवृत्तींचा बंदोबस्त करण्याची वेळ आली आहे, असा स्पष्ट इशारा माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिला.