
संगमनेर : सत्संग सोहळा आध्यात्मिक ऊर्जा देणारा आहे, असे प्रतिपादन माजी आमदार बाळासाहेब थोरात यांनी केले. हजारो अनुयायांची उपस्थिती, शिस्तबद्ध वातावरण, पारंपरिक वाद्यांचा गजर, पुष्पवृष्टी, विद्यार्थ्यांच्या झांजरी पथकासमवेत चंदनापुरी (ता. संगमनेर) येथे गुरुवारी महानुभाव पंथातील सत्संगात श्रद्धेय मोठेबाबा यांची मिरवणूक पार पडली.