
संगमनेर : विधानसभेतील अपयशानंतरही माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी संयमी आणि दूरदृष्टीपूर्ण पवित्रा घेतला असून, त्यांनी थेट सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीकडे मोर्चा वळवत सहकारातून राजकीय पुनरागमनाचा मजबूत टप्पा उभा केला आहे. कार्यकर्त्यांवर पूर्णपणे अवलंबून न राहता त्यांनी गावोगावी फिरून सभासदांशी संवाद साधला आणि अखेर कारखान्याची निवडणूक बिनविरोध करत अध्यक्षपद पुन्हा मिळवले. त्यांच्या सोबत पांडुरंग घुले यांची उपाध्यक्षपदी निवड झाली आहे.