Video : बापरे! नगर जिल्ह्यातील ‘या’ जलाशयाला गळती

शांताराम काळे
Friday, 17 July 2020

रत्नागिरी जिल्ह्यातील तिवरे धरण फुटल्याच्या दुर्घटनेला वर्ष झाले आहे. यातून सरकारने अद्याप काही धडा घेतल्याचे दिसत नाही. अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील बलठण जलाशयाची १२ वर्षातच दुरावस्था झाली आहे.

अकोले (अहमदनगर) : रत्नागिरी जिल्ह्यातील तिवरे धरण फुटल्याच्या दुर्घटनेला वर्ष झाले आहे. यातून सरकारने अद्याप काही धडा घेतल्याचे दिसत नाही. अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील बलठण जलाशयाची १२ वर्षातच दुरावस्था झाली आहे. काही ठिकाणी पाणी गळती होत असून याकडे गांभीर्याने न पाहिल्यास दुर्घटना होऊ शकते.
२०२ दशलक्ष घनफूट क्षमतेचे बलठण जलाशय ५० टक्के भरण्याच्या मार्गावर आहे. जलाशयाच्या भिंती लगतच असणाऱ्या जागेत पक्षांची घरटी आहेत. गेटचे रबर सील, गळतीमुळे जलाशयाच्या भिंतीवर लंपटलेले शेवाळ, वाढलेले गवत, गंजलेली मशिनरी असे दृश्य येथे आहे. 

अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी सरकारच्या २०१६ सरकार निर्णयानुसार वसुली करा व मेंटेनन्स करा, असे आदेश दिले असून या जलाशयावर लाभार्थी कमी असल्याने वर्षाला १४ हजारही वसूल होत नाही. त्यामुळे मेंटेनन्स करता येत नाही, असे सांगितले. बलठन जलाशयाचे काम १९९९- २००० ला सुरु झाले व २००८ ला पूर्ण झाले. औरंगाबाद येथील एस. एन. ठक्कर कंपनीने हे धरण केले असून एक तपानंतर या जलाशयाची गळती सुरु झाली आहे. या बलठनलघु पाटबंधारे तलाव प्रकल्पाचे एकूण सिंचन क्षमता १०७४ हेक्टर क्षेत्र भिजणारे असून सध्य स्थितीला भिजणारे क्षेत्र ६३. ४० हेकटर इतकेच आहे.

आदिवासी भागातील शेतकरी शेती व्यवसायात स्वयंपूर्ण व्हावा म्हणून तत्कालीन मंत्री  मधुकरराव पिचड विशेष बाब म्हणून या जलशयाची मंजुरी घेऊन पाण्याची उपलब्धता करून हा प्रकल्प मंजूर केला. मात्र अजूनही शेतकरी उचलण्याचे प्रमाण अत्यल्प असून त्यातून वर्षाकाठी पाणी पट्टी वसुली १४२२० रुपये इतकी मिळते. त्यातूनच देखभाल दुरुस्ती करावी, असे सरकारने व गोदावरी महामंडळाने १७ नोव्होबर २०१६ मध्ये सरकार निर्णय पारित करून आदेशित केल्याने या लघु पाटबंधारे विभागाची दुरुस्ती ऐवढ्या कमी निधीत होणे अशक्य आहे. मात्र बलठन लघु पाटबंधारे प्रकल्पाचे मशिनरी गाजली असून पत्रे, पाईप, रबर खराब झाले आहेत. शिवाय भिंतीवर मोठे तडे असून त्यातून पाणी झिरपते व त्यावर मोठे शेवाळ साचले आहे. ही दुरुस्थी व्हावी, अशी मागणी ग्रामस्थ व शेतकरी यांनी केली आहे.
जलसंपदा शाखा अभियंता अभिजित देशमुख, बलठन लघु पाटबंधारे प्रकल्पही दुरुस्तीसाठी वरिष्ठांशी चर्चा करून निधी उपलब्ध करून निर्णय घेऊ मात्र वसुली वरच दुरुस्ती व देखभाल करण्याचा आदेश आहेत.

संपादन : अशोक मुरुमकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The Balthan Dam in Akole taluka has started leaking