
Massive participation in Ahilyanagar as Banjara community rallies for Gazetteer implementation and social justice.
Sakal
अहिल्यानगर: हैदराबाद गॅझेटियर व सी. पी. वेरार गॅझेटिअरमध्ये बंजारा समाज हा आदिवासी अनुसूचित जमातीमध्ये समाविष्ट असल्याचा स्पष्ट उल्लेख आहे. लमाण बंजारा समाज हा आदिवासी अनुसूचित जमातीचे असलेले सर्व निकष पूर्ण करत आहे. समाज आर्थिक, शैक्षणिक व सामाजिकदृष्ट्या मागास असल्याने आदिवासी अनुसूचित जमातीचे (एसटी) आरक्षण लागू करावे, या मागणीसाठी सकल गोर बंजारा समाजाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर महामोर्चा आयोजित केला होता.