आरडाओरडा केला पण कोणी येईपर्यंत ३५ हजार रुपये घेऊन चोरटे पसार; श्रीरामपूर तालुक्यातील घटना

गौरव साळुंके
Saturday, 7 November 2020

श्रीरामपूर येथील एका बॅक ग्राहक सेवा केंद्र चालकास चितळी- धनगरवाडी रस्ता परिसरातील रेल्वे भुयारी पुलाखाली तीन चोरट्यांनी लुटल्याचा प्रकार घडला आहे.

श्रीरामपूर (अहमदनगर) : येथील एका बॅक ग्राहक सेवा केंद्र चालकास चितळी- धनगरवाडी रस्ता परिसरातील रेल्वे भुयारी पुलाखाली तीन चोरट्यांनी लुटल्याचा प्रकार घडला आहे. याप्रकरणी संजय साखरे (वय 30. रा. धनगरवाडी) यांनी दिलेल्या फिर्यादिवरुन तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. 

गुरुवारी साडेतीन वाजेच्या सुमारास साखरे येथून आपल्या दुचाकीवर धनगरवाडीकडे जात असताना चितळी-धनगरवाडी रस्त्यावरील रेल्वे भुयारी पुलाखाली दुचाकीवर आलेल्या तीन अज्ञात चोरट्यांनी अडवणुक करुन सुमारे 35 हजार रुपयांसह एक मोबाईल फोन लुटला. यावेळी साखरे यांनी आरडाओरडा केला. परंतू तोपर्यंत चोरटे पसार झाल्याचे त्यांनी सांगितले. 

दरम्यान, धनगरवाडी परिसरातील कैलास राशिनकर यांच्या सोयाबीन पिकांच्या पट्टीची 36 हजार रुपये अज्ञात चोरट्यांनी घडफोडी घरातील डब्यातील पैसे आणि सोन्याचे दागिणे चोरले होते. याप्रकरणी राशिकर यांनी दिलेल्या फिर्यादिवरुन तालुका पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल झाला होता. तालुका पोलिस पथक पसार चोरट्यांचा शोध घेत असताना पोलिसांनी बनावट क्रमांकाची रिक्षा शोधली आहे. त्यानुसार पोलिस पसार चोरट्यांचा शोध घेत आहे. त्यात आज घडलेल्या रस्ता लुटीच्या प्रकारामुळे परिसरात भितीचे वातावरण पसरले आहे.

संपादन : अशोक मुरुमकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Bank customer service center operator robbed in Shrirampur taluka