शिक्षकांची कपडे फाडाफाडी टळणार; कोरोनामुळे बॅंकेची ऑनलाइन सभा होणार

The banks meeting will be held online this year as the number of corona is increasing.jpg
The banks meeting will be held online this year as the number of corona is increasing.jpg
Updated on

अहमदनगर : जिल्हा प्राथमिक शिक्षक बॅंकेची सर्वसाधारण सभा म्हटल्यानंतर सत्ताधारी व विरोधक यांच्यात नेहमीच आरोप-प्रत्यारोप होत असतात. त्यातून एकमेकांची प्रतिमा मलिन करण्याचा उद्योगही सभेअगोदर केला जातो. त्यानंतर सर्वसाधारण सभेत मुद्‌द्‌यांवरून गुद्यांवर सत्ताधारी व विरोधक येऊन एकमेकांचे कपडे फाडण्याचे प्रकारही अनेकदा घडलेले आहेत. 

यंदा कोरोनामुळे बॅंकेची सभा ऑनलाइन होणार असल्यामुळे शिक्षकांची बेअब्रू टळणार आहे. बॅंकेवर आपले वर्चस्व राहावे, यासाठी सर्वच शिक्षक संघटना प्रयत्न करीत असतात. प्रत्येक मंडळ व संघटनेला बॅंकेत काम करण्याची संधी मिळालेली आहे. त्यामुळे बॅंकेतील बारकाव्यांची सगळ्यांनाच माहिती असल्यामुळे त्याचा आधार घेत सत्ताधाऱ्यांना विरोधकांकडून नेहमीच सर्वसाधारण सभेच अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला जातो. सभेत सुरवातीला शाब्दिक वादावादी सुरू होऊन त्याचे हाणामारीत अनेकदा रूपांतर झाले आहे. एकमेकांचे कपडेही फाडण्यात आलेले आहेत. काही सभांमध्ये विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर टोमॅटो, बिर्याणी, खजूरही फेकले आहे. 

यंदा प्रथमच जिल्हा प्राथमिक बॅंकेची सभा ऑनलाइन पद्धतीने होणार आहे. त्यामुळे सभेमधील गैरप्रकारांना आळा बसणार आहे. बॅंकेचे कार्यक्षेत्र राज्य करणे, घड्याळ खरेदी आदी मुद्यांवरून चांगलेच वादंग होणार होते. विशेष म्हणजे सत्ताधारी गटात दोन गट पडलेले असल्याने ही सभा चांगलीच गाजणार होती. मात्र कोरोनामुळे सभा ऑनलाइन होत असल्याने विरोधकांना पत्रबाजीच करण्याची वेळ आलेली आहे. 

अभासी पद्धतीने होणारी वार्षिक बैठक संचालकांच्या पथ्यावर पडणार आहे. अनेक वादग्रस्त मुद्‌द्‌यांना विरोध कसा करायचा, हा आमच्या पुढे प्रश्‍न आहे. संचालकांनी मनमानी ठराव करू नये. जिल्हा उपनिबंधकांनी स्वतः उपस्थिती लावावी. 
- डॉ. संजय कळमकर, शिक्षक नेते. 

ऑनलाइन सभेमुळे सर्वांच्या मान्यतेने ठराव मंजूर केले जाणार आहेत. या सभेत सर्वच सभासदांना ऑनलाइन पद्धतीने घरबसल्या सहभागी होता येणार आहे. गेल्या पाच वर्षांपासून सभांचे मते जाणून घेऊनच धोरणात्मक निर्णय घेण्यात आलेले असून, त्याची पुनरावृत्ती या सभेत होणार आहे. 
-बापूसाहेब तांबे, जिल्हाध्यक्ष, शिक्षक संघ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com