esakal | दुसऱ्याची फेसबुक, व्हॉटस अॅपवरील पोस्ट चोरत असाल तर सावधान...

बोलून बातमी शोधा

Be careful if you are stealing someone else's Facebook post ...

काही फेक ज्योतिषी या पोस्टची चोरी करून आपल्या नावावर खपवतात. हे ज्योतिषी आपण फार तज्ज्ञ असल्याचे भासवून लोकांकडून मोठी रक्कम उकळतात.

दुसऱ्याची फेसबुक, व्हॉटस अॅपवरील पोस्ट चोरत असाल तर सावधान...
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नगर ः कोणत्याही लेखकाने लेखन केले तर त्याचे अधिकार त्याच्याकडे असतात. कॉपीराइट कायद्यानुसार त्याची बौद्धिक संपदा कोणी चोरी करू शकत नाही. जर कोणी असे केले तर त्याला शिक्षा होते. परंतु समाजमाध्यमात लिखाण करणाऱ्यांची संख्या अलिकडे वाढली आहे. प्रत्येकजण कॉपी राइट हक्कासाठी कायदेशीर मार्गाचा अवलंब करीत नाही. त्यामुळे चोरांचे फावते. ज्योतिषांच्या लिखाणीही चोरी होत होती. दुसऱ्याची बौद्धिक संपदा कोणी चोरी करीत असेल तर सावधान...

फेसबुकवर ज्योतिष शास्र अभ्यासकांचे अऩेक ग्रुप सक्रीय आहेत. त्या विविध फेसबुक ज्योतिष ग्रुपवर महाराष्ट्र व देशभरातील अनेक दिग्गज ज्य़ोतिष आपल्या अभ्यासातून ज्ञान देत असतात. अनेक वाचक सदर ज्योतिषांना संपर्क करून त्यांच्याकडुन मार्गदर्शनही घेत असतात. परंतु काही फेक ज्योतिषी या पोस्टची चोरी करून आपल्या नावावर खपवतात. हे ज्योतिषी आपण फार तज्ज्ञ असल्याचे भासवून लोकांकडून मोठी रक्कम उकळतात. त्यांनी वर्तवलेले ज्योतिष हमखास चुकते. कधीकधी चुकून एखादे बरोबर आले तर त्याची जाहिरात करून लोकांना भुलवतात.

हेही वाचा - कर्जत-जामखेडसाठी रोहित पवारांनी पुन्हा दिला १४ ट्रक शिधा

एखादे संशयास्पद फेसबुक अकाउंट ज्योतिष ग्रुप अॅडमिनला अाढळले तर अॅडमिन सदर फेक ज्योतिषाला ब्लाँक करत असे. परंतु सदर फेक ज्योतिषी दुसऱ्या ग्रुपवर जाउन किंवा दुसरे अकाउंट तयार करून आपले कार्य सुरू ठेवत असे. त्यातून लोकांची फसवणूक होत होती. तसेच ज्योतिषशास्त्रही बदनाम होत होते. फेसबुकवरील छत्रपती ज्योतिष समुहाचे प्रमुख व महाराष्ट्रातील प्रसिद्ध ज्योतिष,  चक्रीय अष्टकवर्ग या गहण ज्योतिष पद्धतीचे गाढे अभ्यासक संतोष घोलप (अहमदनगर)  यांनी या प्रकारावर चिंता व्यक्त केली. या प्रकारावर तोडगा काढण्यासाठी सर्व फेसबुक अॅडमिन एकत्र आले. 

हे ज्योतिष आहेत महासंघात

फेसबुकच्या अथांग सागरात फेक ज्योतिष शोधन किंवा अशा प्रकारातून सर्वसामांन्याची फसवणूक थांबवणे हे तगडे आव्हान निर्मान झाले होते. त्यांनी फेसबुकवरील विविध ज्योतिष ग्रुप अँडमिनला संपर्क केला. त्यात ज्योतिषाचार्या डॉ. ज्योति जोशी (जळगाव) , ज्योतिष तज्ज्ञ दर्शन शुक्ल (पंचवटी, नाशिक), ज्योतिष तज्ज्ञ आमोद ननानरे (वसई पश्चिम, पालघर)
, ज्योतिष तज्ञ रवींद्र वि. नार्वेकर (सुरक्षा नगर, हडपसर, पुणे), ज्योतिष तज्ञ अंकुश सु. नवघरे (पालघर), बालयोगी केतन महाराज गुप्ता (पाली. रायगड), ज्योतिष तज्ज्ञ  देवेंद्र माणगावकर (वरळी कोळीवाडा, मुंबई), ज्योतिष तज्ञ प्रसाद पद्माकर कुलकर्णी (पंढरपूर), ज्योतिष तज्ञ विजयानंद पाटील (कोल्हापुर), विक्रम सुधाकर येंदे ( विक्रोळी, मुंबई), ज्योतिष तज्ञ शामसुंदर पवार. हे ज्योतिषी एकत्र आले. हे सर्व जवळपास 50 पेक्षा जास्त ज्योतिष ग्रुपचे प्रमुख आहेत. सर्व ग्रुपवर जवळपास 8 ते 10  लाख लोक सक्रीय आहेत. या सर्व अॅडमीनला एकत्र आणून अॅडमिन महासंघ स्थापन करण्यात आला. तसेच त्यांचा एक व्हाँटसप ग्रुप तयार करून संतोष घोलप यांची महासंघ प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली.

कुठल्याही वेगवेगळ्या ग्रुपवर दोन समान लिखाण असणाऱया पोस्ट असणाऱ्या लेखकांना एकत्र बोलावून त्याची शहानिशा केली. जे  फेक ज्योतिष सापडतील, त्यांना समज देउन पोस्ट चोरी न करण्याच्या सूचना केल्या. न ऐकल्यास त्या सर्व ग्रुपमधून ब्लॉक तर करायचे शिवाय लोकांसमोर त्याची चोरी उघडी पाडायची. त्यामुळे िलखाण चोरीला आळा बसला. सर्वात महत्त्वाचे म्हणजे फेक ज्योतिषापासून लोकांची फसवणूक टळणार आहे. कोणी याला दाद दिली नाही तर कायदेशीर मार्गाने त्याच्यावर कारवाई केली जाणार आहे. त्यामुळे कोणाची पोस्ट स्वतःच्या नावावर खपवू नका.