
राहुरी शहरात आज सकाळपासून कडकडीत बंद पाळण्यात आला. अत्यावश्यक सेवा वगळता बाजार पेठ बंद आहे.
राहुरी (अहमदनगर) : राहुरी शहरात आज सकाळपासून कडकडीत बंद पाळण्यात आला. अत्यावश्यक सेवा वगळता बाजार पेठ बंद आहे. आज दिवसभर व्यापारी पेठ बंद ठेवण्याचा निर्णय घेतल्याचे व्यापारी संघटनेचे अध्यक्ष प्रकाश पारख यांनी सांगितले.
राहुरी बाजार समितीत आज कांद्याचे लिलाव रद्द करण्यात आले. शेतकऱ्यांना तसे कालच निरोप देण्यात आले. त्यामुळे बाजार समितीत शुकशुकाट आहे.