कार्यकर्त्यांमुळेच बीजेपी देशातच नव्हे तर जगात अव्वलस्थानी

मनोज जोशी 
Saturday, 12 December 2020

भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांसाठी प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करण्यात आले. प्रदेश सचिव स्नेहलता कोल्हे यांच्या हस्ते या वर्गाचे दिपप्रज्वलन करुन या प्रशिक्षण वर्गाचे उदघाटन करण्यात आले.

कोपरगाव (अहमदनगर) : संघटनात्मक पक्ष गुणात्मक व्हावा, या दृष्टीने काम केलेल्या कार्यकर्त्यांमुळेच भारतीय जनता पक्ष देशातच नव्हे तर जगात अव्वलस्थानी आहे. विकासाच्या प्रक्रियेत शेवटच्या घटकाला सामावून घेण्याचे काम फक्त आणि फक्त भारतीय जनता पक्षाकडूनच होत असल्याचे प्रतिपादन भारतीय जनता पार्टीचे प्रदेश सचिव लक्ष्मणजी सावजी यांनी केले.

अहमदनगरच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा 

भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांसाठी प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करण्यात आले. प्रदेश सचिव स्नेहलता कोल्हे यांच्या हस्ते या वर्गाचे दिपप्रज्वलन करुन या प्रशिक्षण वर्गाचे उदघाटन करण्यात आले. भाजपाचे ज्येष्ठ नेते माजी आदिवासी विकास मंञी विष्णू सवरा यांना श्रध्दांजली अर्पण करण्यात आली. उत्तर नगर जिल्हयाचे अध्यक्ष राजेंद्र गोंदकर अध्यक्षस्थानी होते.

औद्योगिक वसाहतीचे चेअरमन युवा नेते विवेक कोल्हे, जिल्हा संघटन सरचिटणीस नितीन दिनकर, माजी जिल्हाध्यक्ष प्रा.भानुदासजी बेरड, सोशल मिडीयाचे राज्य संयोजक प्रवीण अलई, जिल्हा संयोजक जालींदर वाकचौरे, अॅड रविंद्र बोरावके, जिल्हाउपाध्यक्ष शरद थोरात, कैलास खैरे, विनोद राक्षे, सतीश चव्हाण आदीसह तालुका व शहर पदाधिकारी उपस्थित होते. शिर्डी नगरपंचारतीचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष शिवाजीराव गोंदकर यांचा यावेळी सत्कार करण्यात आला.

कोल्हे यावेळी म्हणाल्या, देशहित हाच आपला प्रपंच आणि परिवार असल्याची भावना ठेवून काम करणा-या भारतीय जनता पक्षात आपण सर्वजण काम करीत आहोत, ही अभिमानाची बाब असून तळागाळातील घटकापर्यंत काम करण्याचा माजी मंत्री शंकरराव कोल्हे यांचा वारसा पुढे चालविण्यास भारतीय जनता पार्टीमुळे निश्चितच बळकटी मिळाली आहे.

केवळ राजकीय स्वार्थासाठी एकत्र आलेल्या राज्यातील सरकार मराठा आरक्षण, शेतक-यांचे प्रश्न अशा विविध विषयांमध्ये अपयश आले असल्याने त्याचे खापर वारंवार केंद्रसरकारवर फोडण्याचे काम करीत असल्याची टीका सौ.कोल्हे यांनी केली. सुत्रसंचालन केशव भवर यांनी तर आभार तालुकाध्यक्ष साहेबराव रोहोम व शहराध्यक्ष दत्ता काले यांनी मानले.

संपादन - सुस्मिता वडतिले 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Bharatiya Janata Party is at the forefront not only in the country but also in the world said BJP state secretary Laxman Savji