राम शिंदेंसाठी भाजप पदाधिकाऱ्यांचे जगदंबेला साकडे; महाआरतीसह केली प्रार्थना

Bharatiya Janata Party office bearers have performed Jagdambas Maha Aarti for former Guardian Minister Prof. Ram Shinde
Bharatiya Janata Party office bearers have performed Jagdambas Maha Aarti for former Guardian Minister Prof. Ram Shinde
Updated on

राशीन (अहमदनगर) : माजी पालकमंत्री प्रा.राम शिंदे यांचा कोरोना चाचणी अहवाल सकारात्मक आल्याने या आजारातून प्रा.शिंदे सुखरूप बरे व्हावे, यासाठी भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी सोमवारी (ता.15) राशीनच्या जगदंबेची महाआरती करीत देवीला साकडे घातले.
 
सोमवारी (ता.15) सकाळीच जगदंबा मंदिरात भाजपचे जेष्ठ नेते अल्लाउद्दीन काझी, विक्रम राजेभोसले, माजी सरपंच सुनील काळे, भाजपचे तालुकाउपाध्यक्ष पांडूरंग भंडारे, शहराध्यक्ष एकनाथ धोंडे, भाजप युवा मोर्चाचे शोयब काझी, संकेत पाटील, भटक्‍या विमुक्त आघाडीचे प्रदेश सदस्य तात्यासाहेब माने, ओबीसी मोर्चाचे तालुकाध्यक्ष दत्ता गोसावी, दिलीप नष्टे, संजय ढगे, सोमनाथ कोल्हटकर, डॉ.विलास राऊत, बंटी कदम, अमोल शेटे आदी उपस्थित होते.
 
प्रा.राम शिंदे हे कोरोनाच्या आजारातून लवकर बरे व्हावेत यासाठी भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी सोमवारी राशीन येथे जगदंबेला, सिध्दटेकला सिध्दीविनायकाला, कर्जतला गोदड महाराजांना, मिरजगावमध्ये भैरोबास आणि कुळधरणला जगदंबा मातेस महाआरती करून साकडे घातले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com