भटक्याची पंढरी मढीचे विश्वस्त मंडळ जाहीर

राजेंद्र सावंत
Thursday, 12 November 2020

आमचे विश्‍वस्त मंडळ स्वच्छ व पारदर्शी कारभार करील. भाविकांना सोईसुविधा देण्यासाठी प्रयत्न करून मढी येथे भव्य प्रकल्प उभारून मढी व देवस्थानच्या रूढी पंरपरेला जपण्याचा आमचा प्रयत्न राहील.

पाथर्डी ः भटक्यांची पंढरी म्हणून समजल्या जाणाऱ्या श्री क्षेत्र मढी देवस्थानचे अकरा जणांचे विश्वस्त मंडळ नगरच्या सहायक धर्मादाय आयुक्त कार्यालयात गुरुवारी जाहीर केले. 

स्थानिकांमधून सहा तर भाविकांमधून पाच विश्वस्त मंडळ नेमले जाते. विश्वस्त मंडळ पुढीलप्रमाणे ः संजय बाजीराव मरकड, विमल नवनाथ मरकड, भाऊसाहेब जनार्दन मरकड, डॉ. विलास रावसाहेब मढीकर, राधाकिसन आंबादास मरकड, शामराव आसराची मरकड, अर्जुनराव भगवानराव शिरसाठ, रवींद्र बाबुराव आरोळे, अॅड ,शिवाजी बलभीम डोके, सचिन हरिभाऊ गवारे, तानाजी रामचंद्र ढसाळ यांची निवड करण्यात आली आहे.

आमचे विश्‍वस्त मंडळ स्वच्छ व पारदर्शी कारभार करील. भाविकांना सोईसुविधा देण्यासाठी प्रयत्न करून मढी येथे भव्य प्रकल्प उभारून मढी व देवस्थानच्या रूढी पंरपरेला जपण्याचा आमचा प्रयत्न राहील, असे नवनिर्वाचित विश्वस्तांनी सांगितले. अहमदनगर

संपादन - अशोक निंबाळकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: bhatkyanchi Pandhari Madhi Board of Trustees announced