
-नीलेश दिवटे
कर्जत : कारगिल युद्धात भारताने पाकिस्तानवर विजय मिळविला. मात्र, त्या युद्धात प्रत्यक्ष सहभाग नोंदविलेल्या एका जिगरबाज माजी सैनिकाचा थरारक अनुभव त्यांनी सांगितला. भाऊसाहेब देविदास रानमाळ हे १९९६ ते २०१८ भारतीय लष्कराच्या ३६ मराठा मीडियम रेजिमेंटमध्ये सेवेत होते. या काळात अनेक ठिकाणी पोस्टिंग झाली, परंतु कारगिल युद्धावेळी माझी तैनाती लोंगेवाल, राजस्थान - पाकिस्तान बॉर्डरवर होतो.