
श्रीगोंदे: पुणे जिल्ह्यात झालेल्या जोरदार पावसामुळे भीमा व घोड नद्यांच्या पाणीपातळीत मोठी वाढ झाली आहे. जिल्हा प्रशासनाने नदी काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. सायंकाळी सहा वाजता भीमा नदीचा दौंड पूल येथील विसर्ग १ लाख क्यूसेकच्या पुढे गेला होता. दरम्यान, भीमा नदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ झाल्याने तालुक्यातील आर्वी बेटाचा संपर्क तुटला आहे.