
अहिल्यानगर : भिंगारकरांना सेवा देण्याच्या दृष्टीने स्वतंत्र नगरपरिषद करण्यासाठी गेल्या अनेक दिवसांपासून मागणी होती. याबाबत आमदार संग्राम जगताप यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांना वारंवार निवेदने दिली. त्यावर चर्चा होऊन भिंगार स्वतंत्र नगरपरिषद करू, अशी घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली आहे.