
सोनई : आमचे ऑनलाईन दिसणारे मुख्यमंत्री कधी आमच्याशी बोललेच नाहीत. त्यामुळे आम्हाला उठाव करावा लागला, असे शरसंधान खासदार संदीपान भुमरे यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर साधत आमचा उठाव जनतेच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी सत्कारणी लागला. मला मिळालेल्या मंत्रिपदाद्वारे शेतकऱ्यांना खऱ्या अर्थाने न्याय देता आल्याने आत्मिक समाधान लाभले अशी पुश्तीही त्यांनी जोडली.