‘बिरोबा’कडून १० शेतकऱ्यांचा सन्मान; वर्षभर दूध घातल्यामुळे चार हजार किलो साखर वाटप

विलास कुलकर्णी
Wednesday, 11 November 2020

घोरपडवाडी येथील बिरोबा दूधसंकलन केंद्रातर्फे दूधउत्पादकांना 20 लाख रुपयांची एकरकमी ठेव व बोनस म्हणून चार हजार किलो साखरवाटप करण्यात आली. वर्षभर नियमित दूधपुरवठा करणाऱ्या 10 शेतकऱ्यांचा सन्मान करण्यात आला

राहुरी (अहमदनगर) : घोरपडवाडी येथील बिरोबा दूधसंकलन केंद्रातर्फे दूधउत्पादकांना 20 लाख रुपयांची एकरकमी ठेव व बोनस म्हणून चार हजार किलो साखरवाटप करण्यात आली. वर्षभर नियमित दूधपुरवठा करणाऱ्या 10 शेतकऱ्यांचा सन्मान करण्यात आला.
 
अध्यक्षस्थानी घोरपडवाडीचे माजी उपसरपंच नवनाथ शेंडगे होते. दूध केंद्राचे अध्यक्ष गणेश तमनर, नारायण तमनर, उपसरपंच आप्पासाहेब बाचकर, भानुदास झावरे, विकास गडधे, बापूसाहेब शेंडगे, गोरख थोरात, बाबासाहेब श्रीराम, पोपट थोरात, बाबासाहेब हापसे, बाळासाहेब बाचकर, गोपीनाथ शेंडगे, बाबूराव शेंडगे, कृष्णा सरोदे आदी उपस्थित होते.

अहमदनगरच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा 
 
बिरोबा दूध संकलन केंद्रात 1 सप्टेंबर 2019 ते 31 ऑगस्ट 2020 या कालावधीत दूधपुरवठा करणाऱ्या जनाबापू देवकाते, अरुण शेंडगे, पोपट तमनर, बाळासाहेब हापसे, मारुती लोंढे, बाळासाहेब तमनर, सोपान येळे, गोरख बाचकर, विजय बाचकर, नानाभाऊ बाचकर यांचा सत्कार करण्यात आला. प्रतिलिटर दोन रुपयांप्रमाणे जमा ठेवीची रक्कम 20 लाख रुपये शेतकऱ्यांच्या बॅंकखाती वर्ग करण्यात आले. 

संपादन : सुस्मिता वडतिले


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The Biroba Milk Collection Center at Ghorpadwadi has honored 10 farmers for providing regular supplies throughout the year