esakal | राज्य सरकारविरुद्ध भाजप रस्त्यावर; केंद्र सरकारच्या कृषी विधेयकास स्थगितीचा निषेध
sakal

बोलून बातमी शोधा

BJP agitation against the Maharashtra state government

कृषी विधेयकास स्थगिती दिल्याबद्दल भाजप, राष्ट्रीय समाज पक्ष, शिवसंग्राम पक्ष, रिपब्लिकन पक्ष, रयत क्रांती संघटना व मित्र पक्षांतर्फे आज तहसील कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले.

राज्य सरकारविरुद्ध भाजप रस्त्यावर; केंद्र सरकारच्या कृषी विधेयकास स्थगितीचा निषेध

sakal_logo
By
विलास कुलकर्णी

राहुरी (अहमदनगर) : कृषी विधेयकास स्थगिती दिल्याबद्दल भाजप, राष्ट्रीय समाज पक्ष, शिवसंग्राम पक्ष, रिपब्लिकन पक्ष, रयत क्रांती संघटना व मित्र पक्षांतर्फे आज तहसील कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. 

भाजपचे तालुकाध्यक्ष अमोल भनगडे, जिल्हा उपाध्यक्ष सुभाष गायकवाड, तनपुरे कारखान्याचे संचालक रवींद्र म्हसे, अर्जुन बाचकर, गणेश चौधरी, मच्छिंद्र गावडे, राजेंद्र उंडे, गणेश खैरे, चांगदेव भोंगळ, नानासाहेब जुंधारे, कैलास पवार अरुण साळवे, सुदाम शेळके, नानासाहेब गागरे, शहाजी ठाकूर, अण्णासाहेब शेटे, योगेश देशमुख उपस्थित होते. 

भनगडे म्हणाले, "अतिवृष्टीमुळे बाजरी, मूग, कपाशी, सोयाबीन पीके उपळली आहेत. खरिपाच्या पिकांसह फळबागा व ऊस पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. परंतु, नुकसान झालेल्या सर्व पिकांचे पंचनामे केले जात नाहीत. सरसकट सर्व पिकांचे पंचनामे करून, एक महिन्यात नुकसान भरपाई मिळावी." 

रवींद्र म्हसे म्हणाले, "केंद्र सरकारने मंजूर केलेल्या कृषी विधेयकात शेतकऱ्यांना कुठेही शेतमाल विक्री करण्यास परवानगी दिली. शेतकऱ्यांना व्यापारी व बाजार समितीच्या जोखडातून मुक्त केले. परंतु, राज्य सरकारने कृषी विधेयकास स्थगिती दिली. शेतकरी विरोधी निर्णय घेतला. त्याचा निषेध आहे." तहसीलदार फसियोद्दीन शेख यांनी निवेदन स्वीकारले. 

संपादन : अशोक मुरुमकर

loading image