

Rahuri Bypoll: BJP Shows Confidence in Akshay Kardile
sakal
अहिल्यानगर: राहुरी विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत भाजपने अक्षय कर्डिले यांच्यावरच भरवसा टाकला आहे. आज पक्षाने त्यांना उमेदवारी जाहीर केली. यानंतर कर्डिले समर्थकांनी एकच जल्लोष केला. या पोटनिवडणुकीत भाजप कोणाला उतरवणार, याविषयी तर्कवितर्क काढले जात होते. आज त्या चर्चांना पूर्णविराम मिळाला.