esakal | स्टॉल वाटप अंगलट?; आमदार कानडे यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची भाजपाची मागणी
sakal

बोलून बातमी शोधा

BJP demands FIR against MLA Kanade

कोविड सेंटरमध्ये आमदार लहू कानडे यांच्या हस्ते समाज कल्याण विभागातुन गटई कामगारांसाठी स्टॉलचे नुकतेच वाटप करण्यात आले.

स्टॉल वाटप अंगलट?; आमदार कानडे यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची भाजपाची मागणी

sakal_logo
By
गौरव साळुंके

श्रीरामपूर (अहमदनगर) : शहरातील कोविड सेंटरमध्ये आमदार लहू कानडे यांच्या हस्ते समाज कल्याण विभागातुन गटई कामगारांसाठी स्टॉलचे नुकतेच वाटप करण्यात आले. यावेळी गर्दी झाल्याने सोशल डिस्टसिंगच्या नियमांचे उल्लंघन झाले. असा आरोप येथील भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे. 

सदर कार्यक्रमासाठी विविध लोकप्रतिनिधींच्या समवेत त्यांचे सहकारी, समाज कल्याण विभागाचे अधिकारी यांच्यासह 53 लाभार्थी व कार्यकर्ते उपस्थित होते. त्यामुळे कोरोनाच्या पार्श्वभुमीवर गर्दी करण्यास मनाई असुन बेजबाबदारपणे गर्दी जमविणाऱ्या आमदारांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी भाजपा तालुकाध्यक्ष सुनिल वाणी, अशोकचे संचालक बबन मुठे, भाजपा शहर संघटन सरचिटणीस सतिश सौदागर, विशाल अंभोरे, विशाल यादव यांनी केली आहे. 

यासंदर्भात भाजपाच्या वतीने अप्पर पोलिस अधीक्षक डॉ. दिपाली काळे यांना कारवाईच्या मागणीचे निवेदन देण्यात आले. दरम्यान, दूध उत्पादकांनी दुध दरवाढीसाठी राज्यात आंदोलने केले. त्यावेळी सत्ताधारी आमदारांनी आदोलकांवर गुन्हे दाखल करण्याच्या सुचना पोलिसांना दिल्या. त्यामुळे आता नियमांचे उल्लंघन करणारया आमदारांवर पोलिसानी गुन्हे दाखल करण्याची मागणी भाजपाचे अनिल भनगडे, रामभाऊ तरस, प्रफ्फुल डावरे, सुनिल दिवटे, संतोष हरगुडे, मुकुंद हापसे, महेश खरात, मुकुंद लबडे, विजय लांडे, अक्षय वर्पे, रुपेश हरकल, विशाल गायधने, आण्णा भालेराव यांनी केली आहे.

संबधित पोलिस अधिकाऱ्यांनी निवेदनाची दखल न घेतल्यास भाजपाचे शिष्टमंडळ याप्रकरणी विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार असल्याची माहिती बबन मुठे यांनी दिली. 

संपादन : अशोक मरुमकर