मका खरेदी केंद्र सुरु करा, अन्यथा ९ पासून भाजप आंदोलन

निलेश दिवटे
Tuesday, 3 November 2020

खासगी व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांची लूट होत असून अत्यंत अल्प दरात मका खरेदी केली जात आहे.

कर्जत (अहमदनगर) : खासगी व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांची लूट होत असून अत्यंत अल्प दरात मका खरेदी केली जात आहे. हे थांबवण्यासाठी तालुक्यात त्वरित शासकीय हमीभाव मका खरेदी केंद्र सुरू करावे अन्यथा अभिनव आंदोलन करण्याचा इशारा भाजपच्या वतीने निवेदनाद्‌वारे देण्यात आला आहे. निवासी नायब तहसीलदार मनोज भोसेकर यांना हे निवेदन दिले. 

भाजपचे तालुकाध्यक्ष डॉ. सुनील गावडे, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख सचिन पोटरे, किसान सेलचे जिल्हा सरचिटणीस सुनील यादव, राहुल निबोरे, डॉ. विलास राऊत, विठ्ठल अनभुले, गणेश फुले, काकासाहेब धांडे, गणेश जंजिरे, सोहेल काझी, सुनील काळे आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते. सध्या तालुक्‍यात मोठ्या प्रमाणात मकाचे उत्पादन झाले. खाजगी व्यापारी मका खरेदी दरात शासकीय हमी भावापेक्षा कमी भाव देत मोठ्या प्रमाणात तफावत ठेवून शेतकऱ्यांची लूट करीत आहेत. याकडे विद्यमान लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष आहे. त्यामुळे शेतकरी हित समोर ठेवीत तालुक्यात शासकीय हमी भाव मका खरेदी सुरू करणे अत्यंत गरजेचे आहे.

याबाबत येत्या आठ दिवसात उचित कारवाई न केल्यास येत्या ९ नोव्हेंबरला सकाळी 11 वाजता तहसील कार्यालया समोर भाजपाच्या वतीने अभिनव आंदोलन करण्यात येईल येईल, असा इशारा तालुकाध्यक्ष डॉ. गावडे यांनी दिला आहे.

संपादन : अशोक मुरुमकर 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: BJP demands to start maize procurement center in Karjat